अनेक वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढा सुरू आहे. ही लढाई गल्ली ते दिल्ली आणि न्यायालयांपर्यंत बौद्धांचे हक्क, बौद्धांचे अधिकार प्राप्त करण्यासाठी सुरू आहे. अनागारिक धम्मपाल यांनी सुरू केलेला हा लढा पुढे भंते सुरई ससाई नागार्जुन यांनी जिवंत ठेवला. अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा भदन्त विशुद्धानंदबोधि, भंते विनाचार्य, भंते केके राहुल, भंते सुमित रत्न, अशोक लामा, विलास खरात यांच्या प्रमुख नेतृत्वात हा लढा पुन्हा सुरू झाला. पाहता पाहता या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा सुद्धा जाहीर केला. अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत स्वतः सहभागी झाले. या लढ्याचा पुढील टप्पा. महाबोधी महाविहार मुक्ती लढा अजून तीव्र गतीने करण्यासाठी धम्म ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
धम्म ध्वज यात्रेचा पहिला टप्पा दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा होणार आहे. 17 ऑगस्ट 2025 दीक्षाभूमी येथून सकाळी 9 वाजता धम्म ध्वज यात्रेला सुरुवात होईल. दिनांक 02/09/2025 दादर येथे डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातुला वंदन करुन पहिला टप्पा समाप्त करण्यात येईल. यासाठी तन-मन-धनाने या यात्रेला आपण सहकार्य करावे. सर्व गट-तट, मतभेद बाजूला सारून आपल्या अस्तित्व आणि अस्मितेच्या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सर्व उपासक व उपासिकांनी धम्म ध्वज यात्रेत पांढरे वस्त्र परिधान करून हातात पंचशिल ध्वज घेऊन सहभागी व्हावे. जे उपासक/उपासिका वाहनांनी यात्रेत सहभागी होतील त्यांनी वाहनांवर पंचशिल ध्वज लावावे. असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.- 1. दिनांक 17/08/2025 दिक्षाभूमी वरुन आर्वी येथे दुपारी 2 वा. सभा, अमरावती कडे प्रस्थान व अमवरावती मध्ये सायं. सभा व मुक्काम
- 2. दिनांक 18/08/2025 सकाळी 11 वा. कारंजा लाड येथे सभा व भोजनदान, मंरुळपीर येथे सायं. 5 वा सभा आणि वाशिम ला मुक्काम
- 3. दिनांक 19/08/2025 वाशिम येथे सकाळी सभा व पगोडा चिंचोली मुक्काम
- 4. दिनांक 20/08/2025 बार्शी टाकळी मार्गे अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे सभा तसेच रात्री अशोक वाटीका अकोला येथे सभा व नंतर अकोला येथे मुक्काम.
- 5. दिनांक 21/08/2025 शेगाव सकाळी 11 वाजता सभा बुलढाणा रात्री येथे मुक्काम
- 6. दिनांक 22/08/2025 बुलढाणा येथे दुपारी सभा व मुक्काम
- 7. दिनांक 23/08/2025 जालना रात्री सभा व मुक्काम
- 8. दिनांक 24/08/2025 संभाजीनगर येथे दुपारी सभा व मुक्काम (2 दिवस 24 व 25 ऑगस्ट)
- 9. दिनांक 26/08/2025 जळगाव येथे सभा व भुसावळ येथे मुक्काम अकोला
- 10 दिनांक 27/08/2025 धुळे सकाळी 11 वाजता सभा, सायंकाळी 7 वा. मालेगाव येथे सभा व मुक्काम
- 11. दिनांक 28/08/2025 नाशिक दुपारी सभा व मुक्काम
- 12. दिनांक 29/08/2025 कल्याण येथे दुपारी सभा व मुक्काम
- 13 दिनांक 30/08/2025 डोंबिवली दुपारी सभा व ठाणे येथे मुक्काम
- 14. दिनांक 31/08/2025 ठाणे येथे दुपारी सभा
- 15. दिनांक 01/09/2025 मुंबई चेंबुर येथे सभा व घाटकोपर येथे सभा
- 16. दिनांक 02/09/2025 दादर येथे डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातुला वंदन करुन पहिला टप्पा समाप्त करण्यात येईल.
03 सप्टेंबर 2025 चैत्यभुमी मुंबईवरुन धम्मध्वज यात्रा प्रस्थान
मार्ग- नवी मुंबई, पनवेल, कर्जत, खोपोली, लोणावळा, तळेगाव येथे दुपारी 3 वा. सभा, पिंपरी चिंचवड ला सायं. 7 बा. सभा व मुक्काम,
1. दिनांक 04/09/2025 पूणे भीमा कोरेगाव सलामी त्यानंतर पूणे सभा व पुर्ण मुक्काम
2. दिनांक 05/09/2025 सातारा सभा व सातारा मुक्काम
3. दिनांक 06/09/2025 कोल्हापूर सभा व सांगली सभा व मुक्काम
4. दिनांक 07/09/2025 पंढरपूर सभा व सोलापूर सभा व मुक्काम
5. दिनांक 08/09/2025 बार्शी सभा व धाराशिव सभा व धाराशिव येथे मुक्काम
6. दिनांक 09/09/2025 बीड सभा व बीड मुक्काम
7. दिनांक 10/09/2025 अंबेजोगाई सभा, लातूर सभा व लातूर मुक्काम
8. दिनांक 11/09/2025 नांदेड सभा व मुक्काम
9. दिनांक 12/09/2025 परभणी येथे सभा व मुक्काम
10 दिनांक 13/09/2025 हिंगोली येथे सभा व मुक्काम
11. दिनांक 14/09/2025 पुसद येथे सभा व मुक्काम
12. दिनांक 15/09/2025 मुळावा येथे सभा व मुक्काम तसेच भंतेजींकडे मुक्काम
13 दिनांक 16/09/2025 दिग्रस दुपारी 12 वा. सभा व भोजनदान दारव्हा, यवतमाळ येथे साय. सभा व मुक्काम
14. दिनांक 17/09/2025 वर्धा येथे सभा व मुक्काम
15. दिनांक 18/09/2025 हिंगणघाट, भद्रावती व्हाया चंद्रपूर येथे सायं. सभा व मुक्काम
16. दिनांक 19/09/2025 गडचिरोली येथे सभा व मुक्काम
17. दिनांक 20/09/2025 वडसा मार्गे अर्जुनी मोरगांव भंडारा येथे सभा व मुक्काम
18. दिनांक 21/09/2025 गोंदिया येथे सभा व मुक्काम
19. दिनांक 22/09/2025 बालाघाट येथे सभा व मुक्काम
20. दिनांक 23/09/2025 शिवनी व्हाया छिंदवाडा येथे सभा व मुक्काम
21. दिनांक 24/09/2025 सौंसर, मध्य प्रदेश येथे सभा व धम्म ध्वज यात्रेचे समापन

0 टिप्पण्या