Top Post Ad

शहर विकास विभागाचा,अनागोंदी कारभार

शहरी भागात विकास योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करत सुनियोजित विकास करण्याची जबाबदारी शहर विकास विभागाची आहे असे असताना या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याने चौकशीच्या मागणीसाठी ठाणे काँग्रेस च्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  महापालिका मुख्यालयासमोर बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

       ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार कसा काय बोकाळला आहे याबाबत विकासक शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत ठाण्याची कशी लूट करत आहेत याची पोलखोल काँग्रेस चे केली आहे.यावेळी त्यांनी शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे यांची भेट घेत महापालिका बिल्डरांवर मेहरबानी करत सर्व नियमांना बगल देत ठाणेकरांची करत असलेली फसवणूक, येऊर वनपरिक्षेत्रात दिलेल्या बांधकाम परवानग्या, आरक्षण बदल, टीडीआर घोटाळा,शैक्षणिक भूखंड वाटप घोटाळा, वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असणारे अधिकारी,शहर विकास विभागाने बदललेली आरक्षणे,कायद्याचा गैरवापर, रेंटल हाउसिंग , पी पी पी तत्वावर नियमबाह्य दिलेल्या परवानग्या, कोर्टात चालू  असलेल्या केसेस, अधिकाऱ्यांनी विकासकांना झुकते माप देत त्याच प्रकल्पामध्ये केलेली गुंतवणूक,चुकीचे देत असलेले डी पी रिमार्क, UDCPR चा होत असलेला भंग या सगळ्या गोष्टी समोर आणत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.

        या एकदिवसीय उपोषणात ठाणे काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह भालचंद्र महाडिक, राजेश जाधव,जे बी यादव,निशिकांत कोळी, गणेश वैती,सनी थॉमस,हिंदुराव गळवे,स्मिता वैती,संगीता कोटल,शिल्पा सोनोने,शीतल अहेर,मीना कांबळे,उमेश कांबळे, दरम्यानसिंग बिष्ट,दयानंद एगडे ,प्रसाद पाटील,शिरीष घरत,विनीत तिवारी,अजित ओझा, यज्ञेश वाडेकर,आशिष गिरी,अजिंक्य भोईर,बाबू यादव,पप्पू सिंग,धर्मवीर मेहरोल, वसिम सय्यद,निलेश पाटील,निलेश अहिरे, नुर्शिद शेख,श्रीकांत गाडीलकर, आनंद सांगळे, सुरेश भोईर,जयेश परमार,यासीन मोमिन,अंजनी सिंग,यकिंदर टमाटा, अमन बरतवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com