Top Post Ad

मुंबई-ठाणे महानगरपालिका निवडणुक.... अधिसूचना जारी

मुंबई  महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (२०२५) प्रभागांची संख्या व भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. महापालिका आयुक्तांनी आज अधिसूचना प्रसिद्ध करून प्रारूप प्रभागांची रचना जाहीर केली असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.  राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ५ व कलम १९ अंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, आगामी निवडणुकीसाठी महानगरपालिकेचे एकूण २२७ प्रभाग निश्चित करण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून एकच सदस्य निवडला जाणार आहे. तर यंदाही ठाणे महानगरपालिका निवडणुकीत चारचे पॅनल असणार आहे.  ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग रचनेबाबत महत्त्वाची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार ठाणे महानगरपालिकेतील सदस्यसंख्या व प्रभागांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार ठाणे महापालिकेत एकूण १३३ नगरसेवक असतील. त्यामध्ये चार सदस्यीय प्रभागांची संख्या ३२ असेल. केवळ एकच तीन सदस्यीय प्रभाग असणार आहे.  यामुळे ठाणे महापालिकेतील एकूण ३३ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.

  मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या भौगोलिक सीमांची अधिसूचना प्रसिद्धी : शुक्रवार, २२ ऑगस्ट तर  हरकती व सूचना २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दुपारी ३.०० वा. पर्यंत महानगरपालिका निवडणूक कार्यालय तसेच संबंधित प्रभाग कार्यालयांचे मुख्यालय येथे दाखल कराव्यात असे  महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ४ सप्टेंबरनंतर दाखल होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. तसेच जे नागरिक हरकती व सूचना दाखल करतील त्यांना सुनावणीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.  आगामी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, प्रभाग रचनेत होणाऱ्या बदलामुळे राजकीय समीकरणांवर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत आलेल्या हरकती व सूचनांचा राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने अंतिम विचार होणार असून त्यानंतरच प्रभाग रचना अंतिम केली जाईल असे मुंबई महापालिका निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आङे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com