Top Post Ad

पत्रकार महिलेला थेट उपोषण स्थळी जावून धमकी ... स्वातंत्र्यदिनी भयानक प्रकार

स्वातंत्र्य दिनी जालन्यात उपोषणकर्त्यांना पालकमंत्र्यांना भेटू न देता पोलीस उप अधीक्षकाने उडी घेत त्यांच्या कमरेत लाथ घातल्याचे छायाचित्र राज्यात एकीकडे गाजत आहे. तर दुसरीकडे अमरावती येथे जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांच्या पत्नीने एका पत्रकार महिलेला थेट उपोषण स्थळी जावून धमकी दिल्याची घटना स्वातंत्र्य दिनीच घडली आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यात गाजत असलेले माहिती अधिकाऱ्याचे ' इंडिसेंट प्रपोजल ' चे प्रकरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणात उपोषणकर्त्या पत्रकार वंदना तळखंडे यांनी स्थानिक गाडगे नगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करत कोटुरवार आणि त्यांच्या पत्नीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ' माझ्या पतीच्या विरोधात सुरू केलेले उपोषण बंद कर. अन्यथा तुला बरबाद करुन टाकेन. आमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही ' अशी धमकी आपणांस कोतुरवार यांच्या पत्नीने दिली, असे वंदना तळखंडे यांनी सांगितले. त्या अधिस्वीकृती धारक पत्रकार आहेत. विदर्भातील राज्य सरकारच्या जाहिरात पात्र वृत्तपत्रांच्या यादीत समाविष्ट असलेल्या आणि गेली १० वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या एका साप्ताहिकाची त्या संपादिका आहेत.
पत्रकार वंदना तळखंडे यांचे एक स्थानिक दैनिकही पाच वर्षांपासून अमरावती येथून प्रसिद्ध होत आहे. त्या वृत्तपत्राला राज्य सरकारच्या जाहिरातींसाठी पात्र ठरवण्याच्या बदल्यात शरीरसुख देण्यासाठी माहिती अधिकारी गजानन कोटुरवार यांनी आपला पिच्छा पुरवला ,अशी त्यांची तक्रार आहे. या प्रकरणात कारवाईसाठी त्यांनी १४ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये अमरावतीला रुजू झालेल्या त्या माहिती अधिकाऱ्याचे ' इंडिसेंट प्रपोजल ' ( असभ्य प्रस्ताव) आपण धुडकावून लावले. त्याचा सूडही आपल्यावर त्यांनी उगवला आहे, असा स्पष्ट आरोप या पत्रकार महिलेने केला आहे. आपली अधिस्वीकृती पत्रिका ३ एप्रिल २०२५ रोजीच्या एका पत्राद्वारे कोटुरवार यांनी रद्द केली आहे, अशी माहिती तिने दिली आहे.
  • वंदना तळखंडे...पत्रकार, अमरावती.
  • संपर्क मो :+91 75071 50805
--------------------------------------------
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात आल्या असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तवरील पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर पोलिस त्यांना ताब्यात घेऊन निघाले. पोलिस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकाच्या कमरेत लाथ मारली. एखाद्या चित्रपटात पोलिस जसे उडी मारून लाथ मारतात, तशी Dysp कुलकर्णी यांनी भररस्त्यात लाथ मारली. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. पोलिस दाखल घेत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली, आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांच्या कमरेत लाथ घातली. त्या पोलिस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता? हे मात्र समजू शकले नाही. या घटनेमुळे पोलिसांच्या वागणुकीवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज कुसुमाग्रज असते तर त्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यदेवीला विनवणी करणारी कविता लिहिली असती. अंगावर वर्दी चढवताना घेतलेल्या शपथेची आठवण त्या कुलकर्णी पोलीस अधिकाऱ्याला करून दिली असती. आणि नामदेव ढसाळ असते तर त्यांनी डीवायएसपी कुलकर्णींची तुलना जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांशी केली असती! राज्याच्या गृहमंत्र्यांना थेट सवाल विचारला असता: हे कृत्य तुमच्या राज्याच्या पोलिस मॅन्युअलमध्ये बसते का


स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पोलिसांकडून झालेला हा प्रकार केवळ कायद्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाणारा नाही, तर माणुसकीवर घाव घालणारा आहे. पोलिसांची वर्दी ही जनतेच्या सुरक्षेचं प्रतीक आहे, पण या घटनेत ती वर्दी दडपशाहीचं साधन बनली. आत्मदहनासारख्या टोकाच्या पावलाला जाणाऱ्या व्यक्तीला थांबवण्यासाठी संवेदनशील व व्यावसायिक पद्धत अवलंबणे अपेक्षित असते. पण येथे “फिल्मी स्टाईल” लाथ मारण्याचा प्रकार पाहून हे स्पष्ट होतं की प्रशिक्षण, जबाबदारी आणि मानवी मूल्यांचा अभाव किती गंभीर झाला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा, अशा प्रकारच्या घटनांना परवानगी मिळाल्यास उद्या कुणाच्याही जीवाशी खेळणे सामान्य होईल. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेला हा प्रकार म्हणजे आपल्या लोकशाहीला काळा डाग आहे
अशी चर्चा आता स्वतंत्र भारतातील नागरिक करीत आहेत
----------------------------------------







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com