Top Post Ad

हिंदू धर्माचे तरुण तडफदार आधुनिक सम्राट नितेश राणे महाराज

 हिंदू धर्माचे तरुण तडफदार असे आधुनिक हिंदूहृदयसम्राट नितेश राणे महाराज यांना साष्टांग दंडवत! या आधुनिक हिंदूहृदयसम्राटांचे आज विशेष अभिनंदन! कारण हिंदू धर्माच्या एकूण इतिहासात कोणी कल्पनाही केली नव्हती अशी एक जगावेगळी अभिनव उद्घोषणा या आधुनिक महाराजाने केली आहे. नितेश महाराजांनी असे म्हटले आहे की, प्रत्येक हिंदूंनी या वर्षापासून दरवर्षी वराह देवाची जयंती केली पाहिजे. ही जयंती या वर्षी २५ ऑगस्टला येतेय. एवढी भन्नाट कल्पना या आधी नितेश महाराज वगळता कोणीच केली नव्हती. म्हणूनच या महापुरुषाचे त्रिवार अभिनंदन! वराह हा भगवान विष्णूंचा तिसरा अवतार आहे, असे पुराणात सांगितले आहे. संस्कृतमध्ये 'वराह' म्हणणार्‍या या प्राण्याला मराठीत 'डुक्कर' म्हणतात. मग जर वराहाची जयंती होत असेल तर 'मत्स्य' (मासा), आणि 'कुर्म'(कासव) यांचीही जयंती व्हायलाच हवी. कारण ते सुध्दा भगवान विष्णूंचे पहिले व दुसरे अवतार आहेत. म्हणजेच 'मत्स्य जयंती' व 'कुर्म' जयंतीही व्हायलाच हवी.

खरं तर पुराणात भगवान विष्णूंचे दहा अवतार सांगीतलेत. हे दहा अवतार म्हणजे अनुक्रमे मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुध्द व कल्की होय. आता नितेश महाराजांनी वराह जयंती तर सुरू केलीच आहे. पण त्याचबरोबर त्यांनी मत्स्य जयंती व कुर्म जयंतीही साजरी करावी, ही नम्र विनंती. आता राहिला प्रश्न नृसिंह व वामन जयंतीचा. त्यांचीही जयंती नितेश महाराजांनी सुरू करावी. कारण या अवतारांची आमच्या माहितीनुसार कोणीच जयंती करत नाहीत. बाकी परशुराम, राम, कृष्ण यांची जयंती केली जाते. बुध्द जयंती हिंदू लोक साजरी करत नाहीत. बुध्द जयंती फक्त बौध्द लोक साजरी करतात. हिंदूंनीही बुध्द जयंती साजरी करण्याचा फतवा नितेश महाराजांनी लवकरच काढावा. कारण पुराणात बुध्दांना विष्णूचा नववा अवतार म्हटलं गेलंय. बाकी 'कल्की' चं काय करायचं ते सांगता येत नाही. कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार कल्की अजून जन्मालाच आलेला नाही. खरं तर श्वानसुध्दा अनेक भगवंताचा अवतार मानला जातो. त्यामुळेच श्वान जयंतीचाही नितेश महाराजांनी विचार करायला हवा. जाता, जाता एकच सांगतो की त्यांनी 'पेंग्विन जयंती' सुध्दा करावी. कारण पेंग्विनमध्ये सुध्दा ईश्वराचा अंश असू शकतो. बाकी माणसं पुरात बुडू द्या, मोनोत अडकू द्या, शेतकरी कर्जात बुडू द्या. सकल माणसे खड्ड्यात जाऊद्या. आपण मात्र हिंदू धर्माच्या उन्नतीसाठी अविरतपणे जयंत्या करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com