Top Post Ad

कॉ. एम ए पाटील यांना अखेरचा लाल सलाम

प्रसिद्ध कामगार नेते सर्व श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, बांधकाम कर्मचारी संघ आणि अशा अनेक युनियनचे प्रणेते, अध्यक्ष आणि आधारस्तंभ कॉम्रेड मारुती आबा पाटील (एम ए पाटील) यांचे आज 11 सप्टेंबर रोजी पहाटे अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. कॉ. एम ए पाटील यांनी सुरुवातीपासूनच सर्व श्रमिक संघातून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आणि आपले जीवन कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी समर्पित केले. कॉ. पाटील यांनी सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून तळागाळातील पिचलेल्या कामगारांच्या युनियन संघटित करून त्यांना न्याय मिळवून दिला. 

अगदी वाळू उपसा कामगार, रोलिंग मिल कामगार यांच्या युनियन मोठ्या जोखीम घेऊन संघटित केल्या. तसेच ग्रामीण भागातील कोतवाल, वनकामगार, ऊसतोड कामगार, अंगणवाडी कर्मचारी, महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना संघटित करून त्यांचे शोषण थांबवून त्यांना न्याय द्यायचा अथक प्रयत्न केला. शासनाच्या बांधकाम विभागातील तसेच वन विभागातील अनेक कर्मचारी कॉ. पाटील यांच्या अथक प्रयत्नातून त्यांच्या त्यांच्या नोकरीमध्ये कायम झाले. अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी यांच्या सेवा शर्तीमध्ये, वेतनामध्ये खूप सुधारणा होण्यामध्ये कॉम्रेड पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.

कोरोना काळामध्ये वरिष्ठ नागरिकांना खूप काळजी घेण्याचे निर्देश असतानाही आपले 78-80 वय बाजूला ठेवून, कॉम्रेड पाटील यांनी मंत्रालय आणि शासकीय कार्यालयामध्ये तसेच संबंधित मंत्र्यांकडे सातत्याने संपर्क साधून, प्रत्यक्ष भेटी घेऊन अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांचे पगार चालू ठेवले, त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. वाढत्या वयामध्ये येणारे अनेक आजार असूनही कॉम्रेड पाटील सातत्याने कामगार चळवळ, असंघटित कामगार यांच्या विचार करून त्यांच्यासाठी चळवळी बांधण्याचा आणि शासकीय यंत्रणेवर कामगारांच्या अन्यायाविरुद्ध दबाव तयार करण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सातत्याने ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते आणि कामगार कार्यकर्त्यांना, नेत्यांना सातत्याने मार्गदर्शन करत होते.. कॉम्रेड पाटील यांच्या निधनाने कामगार चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे.

  • कॉ. पाटील यांना अखेरचा लाल सलाम.
  • अमर रहे अमर रहे कॉ. एम. ए. पाटील अमर रहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com