Top Post Ad

अदानीशी संबंधित पोस्टस काढून टाकण्याचे मंत्रालयाचे निर्देश.... अघोषित आणीबाणी विरोधात निदर्शने

अदानीशी संबंधित 138 युट्यूब लिंक्स आणि 83 इंस्टाग्राम पोस्टस काढून टाकण्याचे सुचना व प्रसारण मंत्रालयाने निर्देश दिले. हे प्रसार माध्यमांच्या स्वायत्ततेवर आक्रमण आहे  या अघोषित आणीबाणी विरोधात आज  23 सप्टेंबर रोजी दादर पूर्व रेल्वे स्टेशन लगत निदर्शने केली.यामध्ये महाविकास आघाडी-डावी आघाडी शिवसेना (उबाठा), कॉंग्रेस (आय) राष्ट्रवादी (शप) गट, भाकप, माकप, शेकाप, भाकप (माले) लिब, फॉरवर्ड ब्लॉक, हम भारत के लोग, महिला संघटना संस्था इत्यादि अनेक संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.   सूत्रसंचालन कॉ. प्रवीण मांजलकर यांनी केले. 


अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक चे किशोर कर्डक, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स च्या आर माय टी इराणी, हम भारत के लोग चे फिरोज मिठीबोरवाला, PUCL च्या चैनिका शाह, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सुगंधी फ्रँसिस, सीपीआय (एम एल) लिब.चे श्याम गोहील, FSUI चे मनोज यादव, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे दीपक केतके, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई जिल्हा सचिव शैलेंद्र कांबळे यांनी  यांनी मार्गदर्शन केले.  सरकारचे भांडवली धोरण उघडे पाडत सरकार त्यांच्या मित्रांना मदत करण्याचे धोरण घेत आहे. सोशल मीडियावर सेन्सॉर शिप करण्याचा प्रयत्न असून या विरोधात संघर्ष मजबूत करण्याचे आवाहन केले. निर्भीड पत्रकारीतेवरील हल्ला बंद करा. लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद यासह अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com