प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखमधील जनता गेल्या काही महिन्यांपासून या मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. सोनम वांगचुक हे व्यवसायाने अभियंता असून ते पर्यावरण सरंक्षणासाठी कार्य करणारे कार्यकर्ता आहेत. ते चीन नि चीनी उत्पादने यांच्याविरोधात असून लेह लडाखला राज्याचा दर्जा मिळावा ही त्यांची मागणी आहे. लडाखला राज्याचा दर्जा व सहाव्या अनुसूचीतील समावेशन या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “लडाखच्या जनतेचा संघर्ष न्याय्य असून तो केवळ एका प्रदेशापुरता मर्यादित नाही. हा देशाच्या लोकशाही मूल्यांचा, संवैधानिक अधिकारांचा आणि पर्यावरणीय समतोलाचा प्रश्न आहे. लडाखला आजवर प्रशासकीय दुर्लक्षाचा सामना करावा लागला आहे. तेथील लोकांच्या आवाजाकडे सतत दुर्लक्ष झाले आहे आणि या दुर्लक्षामुळे लडाखचे अद्वितीय व नाजूक वातावरण असुरक्षित राहिले आहे. अशा परिस्थितीत आम्ही सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देतो.”
लडाखला २०१९ साली केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर स्थानिक लोकांनी अनेकदा राज्याच्या दर्जाची मागणी केली आहे. याशिवाय सहाव्या अनुसूचीतील तरतुदी लडाखसाठी लागू झाल्यास तेथील स्थानिक जनतेच्या हक्कांचे व सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. पर्यावरणीय दृष्टीने लडाख हा हिमालयीन पट्ट्यातील अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. हवामान बदल आणि अनियंत्रित पर्यटनामुळे येथील परिसंस्था मोठ्या प्रमाणावर धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना निर्णय प्रक्रियेत अधिक अधिकार मिळावेत, ही मागणी आणखी महत्त्वाची ठरते. प्रकाश आंबेडकर यांनी केलेले समर्थन हे लडाखच्या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर बळकटी देणारे मानले जात आहे.-----------
- सोनम वांगचुक यांना मिळालेले सन्मान आणि त्यांचे शोध …
- 1996 साली त्या जम्मू काश्मिर सरकारतर्फे राज्यपालांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील सुधारणा साठी पदक देऊन गौरविण्यात आले.
- 2001 साली, द वीक तर्फे त्यांना मँन आँफ द इयर हा सन्मान
- 2002 साली अशोका फेलोशिप देण्यात आली
- 2004 साली ग्रीन टिचर अवार्ड
- 2008 साली Real Heroes Award
- 2014 साली युनेस्को तर्फे आर्किटेक्चर आवार्ड
- 2016 आंतरराष्ट्रीय टेरा आवार्ड earthen building साठी
- 2017 साली पर्यावरण क्षेत्रातील कार्यासाठी राज्य सन्मान
- 2017 GlobalAward for Sustainable Architecture
- 2017 GQ Men of the Year Awards, Social Entrepreneur of the Year.
- 2017 Indians for Collective Action (ICA) Honor Award, San Francisco, CA
- 2018 Eminent Technologist of the Himalayan Region by IIT Mandi
- 2018 सिंबॉयोसिस तर्फे मानद डि. लीट
- 2018 रेमन मेगँसेसे आवार्ड
सोनम वांगचुक यांनी लावलेले शोधापैकी बर्फाचे कृत्रिम स्तुप ( Ice Stupa) आणि सौर उर्जेचा वापर करणारे मोबाईल टेंट यांचा समावेश आहे. या टेंटचा हिमालयात तैनात असणा-या भारतीय लष्कराला खूप उपयोग होत आहे. असा हा विद्वान अभियंता , ज्यांवर देशाला गौरव वाटायला हवा. 1996 पासून देशात अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवेगौडा, आय, के. गुजराल पुन्हा वाजपेयी नंतर डॉ. सिंग, या सर्व पंतप्रधानांच्या काळात भारतासाठी गौरव असणारा सोनम वांगचुक भाजप प्रणित मोदी सरकारच्या काळातही अनेक सन्मान मिळूनही आज भारत विरोधक ठरवण्यात येत आहे

0 टिप्पण्या