धारावीकरांना घर देता का घर ?
म्हटलं तर प्रश्नचिन्ह .
म्हटलं तर रूदन ..
आणि म्हटलं तर ..
एका धारावीकराचा आक्रोश..
श्रीहनुमान सेवा मंडळ काळा किल्ला धारावी .....
गेली ६३ वर्ष गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध विषय मांडून समाजप्रबोधन करणार हे मंडळ .
यंदा विषय घेऊन आलंय ...
धारावी पुनर्वसन प्रकल्प
आणि त्यात त्यांनी मांडली आहे व्यथा. एका वृद्धाची ..
घर देता का घर .?
अपुरे पाणी. स्वच्छतेचा अभाव, कचऱ्याचे ढीग, शौचालयाची कमतरता. अशा चिखलवाटा मधून तो जीवन जगत आहेत. पुढे .१९७६ मध्ये फोटोपास देण्यात आले. मग धारावी पुनर्वसन प्रकल्पाबद्दलच्या बातम्या येऊ लागल्या.त्यानंतर दहा वर्षे गेली. मग कुठेतरी १८० स्क्वेअर फुटाचे घर धारावीकरांना मिळावं अशातऱ्हेने हालचाली सुरू झाल्या. त्यातच शिवशाही प्रकल्प आला. दहा-बारा वर्षे गेली मग २२५ स्क्वेअर फुटाचं स्वप्न दाखवलं गेलं. त्यामध्ये अनेक वर्ष गेली.मग ३०० स्क्वेअर फुटाचे घर मिळावं अशी आशा प्रफुल्लीत झाली. असं करता- करता धारावीकराचं स्वतःच्या चांगल्या घरात राहायला जाण्याचे स्वप्न मृगजळा सारखं पुढे- पुढे धावत आहे आणि धारावीकर आशेनं या स्वप्नाकडे पाहतो आहे .
इथे प्रकल्प येऊ नये म्हणून ताकद लावणारे घटकसुद्धा कार्यरत आहेत..अनधिकृत झोपड्या, प्रार्थना स्थळ, अवैध धंदे यांची साखळी आहे...त्यातून दरवेळी विरोध होत आलाय धारावीच्या दोन पिढ्यांनी घराची प्रतीक्षा केली .आता त्याचं म्हणणं आहे तुमची राजकारण होताहेत....आमचा मात्र जीव जातोय.तुमचा हा विरोध . दरवेळी आमच्या घराचे स्वप्न हिरावून घेतोय...राजकारण बाजूला ठेवा. चुलीत घाला....आम्हाला आता घर हवय** ....
धारावीला पुनर्वसन प्रकल्प होऊ नये .यासाठी किंवा अवास्तव मागण्या करणारी राजकीय आंदोलन होत आहेत आणि त्यात धारावीकर अक्षरशः भरडला जातोय .यावर अचूक वेदना मांडणारा देखावा ..धारावीकरांना घर देता का घर ?या विषयाला आपल्या भेदक शब्दांनी वाचा फोडली आहे. आणि या देखाव्याचे लेखन आणि निवेदन केलंय . दूरदर्शनचे वृत्तनिवेदक विजय कदम यांनी . गेली सत्तावीस वर्ष ते गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे असे अनेक विविध विषय मांडत आलेले आहेत.कला दिग्दर्शक व मंडळाचे सल्लागार गणेश खाडे ,नाना आगवणे राहुल कारंडे ,चेतन थोरात ,प्रशांत खरात अशा मंडळींनी विजय कदम यांच्या शब्दांना देखाव्यातून रूप आकार द्यायचा प्रयत्न केला आहे.. हा देखावा पाहून झाल्यावर गणेशभक्त अचंबित होऊन जातो . धारावीकरांच्या समस्यांशी त्याचा परिचय होतो आणि या धारावीला आपण या मोहमयी नगरीमध्ये ,या उद्योग नगरीमध्ये कसं दुर्लक्षित केलं. याबद्दलची मनोमन खंत मनात घेऊन तो बाहेर पडतो.... तेव्हा तो निशब्द झालेला असतो....या देखाव्याला जनमानसातून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे..
राजेंद्र साळसकर

0 टिप्पण्या