Top Post Ad

कंत्राटी कामगार आणि वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागणार…

ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा, किमान वेतन तसेच प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांबाबत आज आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबरोबरच वारसा हक्काची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.याच बैठकीत ठाण्यातील कलर म्युझियम प्रकल्पाला गती देण्याबाबत चर्चा झाली. ठाण्यात जागतिक दर्जाचे कलर म्युझियम उभे राहावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.या भेटीत उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, सीताराम राणे, विकास पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि सर्व विभागांचे उपायुक्त उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून अनेक ठिकाणी कंत्राटदारांकडून कामगारांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. नियमानुसार सुविधा व किमान वेतन न देणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.
प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांची संख्या मोठी असून ती तातडीने निकाली काढावीत, यासाठी इतर महापालिकांचे दाखले देत मागणी करण्यात आली. मालमत्ता विभागाच्या अनेक मालमत्तांचा गैरवापर होत असून काही ठिकाणी भाडेही वसूल केले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. बळकावलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन संबंधितांना नोटिसा देण्यात याव्यात तसेच मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. यावरही आयुक्तांनी कार्यवाहीचे निर्देश दिले.
२०१७ साली झाड पडून मृत्यू झालेल्या नागरिकाच्या पत्नीला महापालिकेत नोकरी देण्याबाबत प्रशासनाने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा मुद्दा मांडला. या विषयावरही सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न झाल्याने शहरातील पदपथ व रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे फेरीवाला धोरण तातडीने राबविण्याची मागणी केली.
यासह
▪️ मसाला गिरण्या बंद करणे
▪️ अनधिकृत बांधकामांवर कारवाई
▪️ महावितरण सबस्टेशनसाठी जागा
▪️ कौशल्य हॉस्पिटल पार्किंग शुल्क
▪️ कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न
▪️ खासगी गृहसंकुलांतील झाडांची मोफत छाटणी
▪️ सुरळीत पाणीपुरवठा, नाले बांधणी व विहिरींचे पुनरुज्जीवन
या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तातडीच्या कार्यवाहीची मागणी करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com