Top Post Ad

ठाण्यातील मुंब्रा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव २ वर्षांपासून बंद

ठाण्यातील मुंब्रा भागातील मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या आणि दोन वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात शेवाळ जमा होऊन पाणी हिरवे झाले आहेत. जलतरण तलावाचे प्रमुख प्रवेशद्वार कायम उघडे असते. त्यामुळे येथे बेकायदा कृत्ये सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने येथे भेट दिली असता, ‘आओ जाओ... घर तुम्हारा’, अशी स्थिती असल्याचे दिसले. चेजिंग रूममधील उघडे लॉकर... कार्यालयातील निखळलेली पीओपी... पंखे, बल्ब गायब... तलावाच्या आजूबाजूला उखडलेल्या फरशा... हे दृश्य पाहिल्यानंतर हाच का तो कोट्यवधी रुपये खर्च केलेला आणि उद्घाटनावेळी चकाचक दिसणारा तलाव?, असा प्रश्न पडतो.

घोडबंदर भागात दोन जलतरण तलावांचे काम पूर्ण होत आले आहे. आणखी दोन जलतरण तलाव करण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारकडून पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ७५ टक्के निधी सरकारचा असेल.  गडकरी रंगायतनच्या शेजारी सर्वात जुना जलतरण तलाव आहे. त्याचा फिल्टरेशन प्लॅंट बदलला आहे. त्यामुळे पोहण्यासाठी येण्याची चांगली व्यवस्था झाली आहे, अशी माहिती प्रशिक्षक कैलास आखाडे यांनी दिली. येथे लॉकर सुविधा, चेंजिग रूम, वॉश रूम उत्तम असल्याचे दिसून आले. बाळकुम येथील जलतरण तलाव खासगी संस्थेला चालविण्यासाठी दिला आहे. तेथे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे पाणी बदलले जाते. येथील फिल्टरेशन प्लॅंट योग्य पद्धतीने सुरू आहे. वर्तकनगर येथील जलतरण तलावाच्या ठिकाणीही चांगल्या सुविधा असल्याचे दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com