Top Post Ad

आठवणीतले बाळासाहेब' जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान

,सालाबादप्रमाणे यंदाही जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला येत्या शुक्रवार, २४ एप्रिल पासून रविवार, २६ एप्रिल  असे तीन दिवस आयोजित करण्यात येत आहे. जय महाराष्ट्र नगर चे भाग्यविधाते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आदरणीय श्री. विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे ४४ वे वर्ष असून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यंदाच्या व्याख्यानमालेचा शुभारंभ 'आठवणीतले बाळासाहेब' या विषयावरील व्याख्यानाने करण्यात येणार आहे.


 शिवसेना नेते खासदार श्री. अरविंद सावंत, बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक सामना या वृत्तपत्रावर डॉक्टरेट प्राप्त करणारे ज्येष्ठ संपादक डॉ. सुकृत खांडेकर आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय श्री. कुमार कदम हे शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफणार आहेत.* शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी कु. कांचन सावंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अपरिचित काव्यगायन सोबत लोकप्रिय निवेदीका सौ. दिपाली केळकर या सदर कवितांचे निवेदन करणार आहेत. रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी ख्यातनाम गायक श्री. मंदार आपटे आणि सहकारी यांच्या 'कितीदा नव्याने तुला आठवावे' या संगीतमय कार्यक्रमा‌द्वारे मराठी आणि हिंदी गीतांचा नजराणा पेश करून जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची सांगता करण्यात येणार आहे. श्री. विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या विविध पुरस्कारांचे वितरण सुद्धा यावेळी करण्यात येईल.

दरवर्षीप्रमाणे ही व्याख्यानमाला एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, टाटा पॉवर हाऊस समोर, मागठाणे, बोरिवली-पूर्व येथे सायंकाळी ७.३० वाजता सुरु होईल. परम आदरणीय विजय वैद्य यांनी सुरु केलेल्या या साहित्य शारदेच्या उपक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहून हा ज्ञानयज अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मार्गदर्शन करावे असे आवाहन  वैभव विजय वैद‌स सचिन वगळज्  प्रा. नयना रेगे, योगेश बसत त्रिवेदी संयोजक, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com