Top Post Ad

"ना खाऊंगा ना खाने दूंगा"

 महाराष्ट्र: अजितदादांवर मोदींनी सिंचन घोटाळ्यात 70000 कोटींचा आरोप केला- मोदींनीच त्यांना एका आठवड्यात उपमुख्यमंत्री केलं. आज त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री आहेत. 

असाम : हिमांत बिस्वा सर्मावर मोदीनी लुई बर्गर भ्रष्टाचार मामल्यात आरोप केले- मोदींनी त्याला आसामचा मुख्यमंत्री केला.

बंगाल : सुवेंदू अधिकारी यास पाच लाखाची लाच घेतांना रंगेहाथ पकडला, मोदींनी फक्त आरोप केला नाही; सभेत रंगेहाथचा व्हिडीओ दाखवला. आज सुवेंदूला मोदींनी  बंगालचा मुख्यमंत्री केलं आहे. 

बिहार : सम्राट चौधरी आरजेडीचे होते तेव्हा वय लपवल्याचा आणि इतरही घोटाळे केल्याचा आरोप मोदींनी केला होता. आज मोदीजींनी सम्राट चौधरी यांना भाजपाचे बिहारचे मुख्यमंत्री केलं आहे. 

उत्तरांचल : विजय बहुगुणा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. भाजपानं त्यांच्यावर बिल्डर लाॅबीशी संगनमत करून काही शे कोटीचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले होते. पुनर्वसनात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मोदीजींनी त्यांना आता उत्तरांचलचं मुख्यमंत्री केलं आहे. 

गोवा : दिगंबर कामत काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. मोदीजींनी त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज मोदीजींनी कामतांना गोव्याचं मुख्यमंत्रीपद दिलं आहे. 

अरुणाचल प्रदेश : पेमा खांडू काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. मोदीजींनी जाहीरसभेत त्यांच्यावर आरोप केले होते. नंतर मोदीजींनी त्यांना सर्व आमदारांसह भाजपात घेतलं. आज ते भाजपाचे अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत.

त्रिपुरा : माणिक सहा त्रिपूरात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. मोदीजींनी त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज माणिक सहा त्रिपुरात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. 

मणिपूर : एन बिरेनसिंह मणिपूरात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. भाजपानं त्यांच्यावरही आरोप केले होते. आज मोदीजींनी त्यांना मणिपूरचं मुख्यमंत्री केलं. 

याखेरीज राज्याराज्यात अशाच प्रकारे आयात किती मंत्री आहेत याची यादी इतकी मोठी आहे की लिहिता लिहिता कदाचित हातच मोडून जाईल तात्पर्य काय तर ज्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यानं आधी इतर पक्षात मजबूत पैसा खाल्ल्याचे आरोप मोदीजींकडून करून घ्यावेत.   मग "ना खाऊंगा ना खाने दूंगा" वाले मोदीजी पुढची सगळी काळजी घेतील.  आज ऐंशी टक्के भारतावर आमचं राज्य आहे असा दावा करणाऱ्या भाजपाची एकूण सोळा राज्यात सरकारं आहेत आणि त्यातील निम्म्या म्हणजे आठ राज्यांत त्यांना त्यांच्या पक्षात मुख्यमंत्रीपदाचा माणूस मिळालेला नाही. परिणामतः आठ राज्यांमध्ये आज पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले मुख्यमंत्री आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com