Top Post Ad

विधानसभाध्यक्षाचे ' भाषण' आणि तीन नोंदी...

 नोंद १. आशाताई भोसले यांच्या शोकप्रस्तावावरील महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या ज्या भाषणाची सर्वाधिक चर्चा काल झाली, समाजमाध्यमांवर संतापाचा महापूर आला. रीक्षावाल्यांच्या आधी विधानसभाध्यक्षाला मराठी शिकवा, अशी त्या पदाचीही खिल्ली उडवली गेली. साक्षात राज ठाकरेंनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत तीव्र नापसंती व्यक्त केली आणि फडणवीसांसह शिंदेंचाही खरमरीत शब्दात भांडाफोड केला. अगदी उजव्यांच्या लेडी टॉलस्टॉय बिंदीवाल्या बाईनेही नार्वेकरांच्या आडनावाचा उध्दार केला, इतका तो महत्वाचा विषय. पण त्याची बातमी महाराष्ट्रातल्या एकाही वर्तमानपत्राने मुख्य पानावर प्रसिध्द केली नाही, हे विशेष! 'सामना' सोडल्यास एकजात सगळ्यांनीच याची बातमी चौथ्या किंवा पाचव्या पानावर केलीय. एरवी आशाताई जिवंत असताना त्यांचे गोडवे गायला मराठी वर्तमानपत्रांची पाने कमी पडत होती. तिथेच काल त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या बदनामीची लक्तरे महाराष्ट्राच्या विधीमंडळात मांडली जात असताना, त्या बातमीचा एक कॉलमसुध्दा कुठल्याही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर नाही, इतकी ती बीन महत्वाची बातमी होती, हे महत्वाचे! देवाभाऊंची एकूणच दहशत मराठी वर्तमानपत्रांवर काय प्रकारच३ आहे, याचा हा प्रत्यक्ष नमुना आहे, असं म्हटलं तर पत्रकार मित्रमैत्रिणी खट्टू होतील. पण कुठलंही वर्तमानपत्र काढून पहा. 


नोंद २. ज्या 'द आशा भोसले' यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या अब्रूचे धिंडवडे काढताना भाजपच्या नार्वेकरांना जराही लाज वाटली नाही, ते भाजपवाले विकले गेलेल्या मिंधे सेनेच्या आमदार, खासदार, नगरसेवकांची काय इज्जत ठेवतात, ठेवत असतील, हे पळून गेलेल्यांनी उघड्या डोळ्यांनी बघून घ्यावं. अर्थात जो आपल्या पक्षाचा राहिला नाही, तो दुसर्‍या पक्षाचा तरी का राहिल, एवढी समज तर भाजपवाल्यांना नक्कीच आहे. त्यामुळे वेळ टळताच या पळून गेलेल्यांचीसुध्दा हालत आशा ताईंच्या बदनामीप्रमाणे केली गेली तर मला नाही वाटत की त्यांच्या मतदारसंघात तर सोडा, आख्ख्या महाराष्ट्रात कुणालाही त्याबद्दल तसूभरही वाईट वाटेल!

नोंद ३. कॉंग्रेसच्या काळात सगळं आपल्याच ताटात ओरबाडून घेणार्‍या पण कायम उजव्यांची तळी उचलून धरणाऱ्या मंगेशकर कुटुंबाची बदनामी महाराष्ट्राच्याच विधीमंडळात ते ही देवाभाऊंच्या कार्यकाळात झाली, हा एकप्रकारे निष्ठुर पण काव्यगत न्यायच म्हणायला हवा. 'थुंकून चाटणे अन् चाटून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे' हेच संपूर्ण मंगेशकर घराण्याचे उजव्या वळचणीचं चारित्र्य राहिलेलं आहे. त्यामुळे 'दीनानाथ मंगेशकर' यांचा उल्लेख 'दीनदयाल मंगेशकर' असा केला हे नार्वेकर चुकून खरंच बोलले आहेत. राज ठाकरेंनी त्यांच्या पत्रात म्हटलं त्याप्रमाणे नार्वेकरांनी आशाताईंच्या वडिलांचे नाव 'दीनानाथ चौहान' म्हटले असते तरी फडणवीसांना फरक पडला नसता. पण महाराष्ट्राला निश्चितच पडला असता. कारण गुंड का असेना पण दीनानाथ चौहानचा मुलगा विजय चौहान हा मांडव्याबद्दल प्रचंड स्वाभिमानी होता, दीनानाथ मंगेशकरांच्या अपत्यांचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा काही तरी संबंध आहे/होता का?

शेवटी जाता जाता एवढंच सांगावसं वाटतं की सो कॉल्ड क्रिकेटचा देव म्हणवणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके मामा अशोक सराफ यांनीसुध्दा हे लक्षात ठेवावं की भाजपवाल्यांकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान जिथे जिथे चिरडला जाईल तिथे तिथे तुमच्या पाठीला कणा असलेला दिसू द्या. अजूनही वेळ गेलेली नाही. नाहीतर मंगेशकरांच्या आशा ताईंचा उध्दार भाजपवाल्यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात केलाय, तुमचा उध्दार करायला ते तेवढाही वेळ थांबणार नाहीत!

आनंद भंडारे, २४ जून २०२६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com