Top Post Ad

मानखुर्दमध्ये घर कोसळून ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

  मुंबईतील मानखुर्द परिसरातील जनता नगर येथे रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळल्याने ५ लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील जनता नगरमधील चाळ क्रमांक ५ मध्ये ही दुर्घटना घडली. घरांचा ढिगारा कोसळताच अनेक रहिवासी त्याखाली अडकले. माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य राबवून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले.

जखमींना गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात एका महिलेसह तीन लहान मुली आणि एका लहान मुलाला मृतावस्थेत आणण्यात आले. राजावाडी रुग्णालयात आणखी एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून एक तरुण जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार अबू असीम आझमी आणि श्रीमती रुक्साना सिद्दिकी उपस्थित होते., स्थानिक नगरसेवक नवनाथ बन यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा समन्वय साधला. दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com