Top Post Ad

Reservation news उपवर्गीकरण करणे म्हणजेच आरक्षण संपवण्याचा घाट - अण्णासाहेब कटारे

- उपवर्गीकरण विरोधात नाशिक येथे "पोलखोल परिषदेचे" आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,उपवर्गीकरणाचा घाट हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने येथील मनुवादी व्यवस्थेच्या सरकारने आखला आहे.घटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ५९ अनु.जात समूहाकरिता अशी निरगाठ बांधून ठेवलेल्या ढाचास सरकारची कोणतीही संस्था छेडछाड करू शकत नाही. अनुसूचित जात समूहाचा  कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार केवळ देशाची सर्वोच्च पंचायत पार्लमेंटलाच आहे तरीही जाणून-बुजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे असे म्हणून सरकार वर्गीकरणाचा घाट घालत आहे.


उपवर्गीकरण करण्याचे सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश हा राज्य सरकारने अंमलात आणावाच असे कुठेही ठासून सांगितले नाही परंतु महाराष्ट्राचे हटवादी सरकार बौद्ध आणि मातंग समाजामध्ये वाद लावून दंगली भडकविण्याचे कारस्थान रचित आहे.वर्गीकरण केल्याने कोणत्याही जात समूहाला त्याचा लाभ तर होणार नाही उलटे नुकसानच होईल असे अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले.

या पोलखोल परिषदेस मुंबई - कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्रतील समस्त आंबेडकरी समाजाचे नेते, विचारवंत, साहित्यिक, प्राध्यापक, प्राचार्य,कवी, कायदे तज्ञ, गायक, वकील, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या परिषदेस आलेल्या मान्यवरांचे निमंत्रक नारायणजी गायकवाड,आदेश पगारे यांनी स्वागत केलं व सूत्रसंचालन अविनाश आहेर  यांनी केले तर महाराष्ट्रातून आलेल्या मान्यवरांचे आभार बिपीन कटारे यांनी मानले.या परिषदेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात उपवर्गीकरण पोलखोल विरोधी परिषदा जिल्हा वार घेण्याचा ठराव पारित करण्यात आला.

या परिषदेस मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, कोळी आगरी सेनेचे अध्यक्ष राजाराम पाटील, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेन नन्नावरे, भीमराज सेना प्रमुख राजु भाई थाटे, भिम आर्मी प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, आरक्षण बचाव समिती महाराष्ट्र अध्यक्ष विलास शेजुळ, वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, रिपब्लिकन नेते किशोर घाटे, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रवक्ते अविनाश शिंदे, बी.एस.पी अध्यक्ष अरुण काळे, अभ्यासक डॉ.प्रवीण गांगुर्डे, भारतीय बहुजन सेना अध्यक्ष डॉ.प्रशांत घोडेराव, जेष्ठ कवी पी.कुमार, पश्चिम महाराष्ट्र प्रदीप कांबळे , ज्येष्ठ नेते सतीश डोंगरे, चर्मकार नेते धरम गोविंद,आर.पी.आर गवई अध्यक्ष भारत पुजारी, आंबेडकरी मोर्चा प्रफुल इंगोले, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख सचिन नांगरे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मराठवाडा प्रदेश अध्यक्ष संतोष मोकळे, प्राध्यापक भारत जाधव ठाणे, अखिल भारतीय आदिवासी सेना अध्यक्ष दि.ना. उघाडे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे, रिपब्लिकन नेते अविनाश गायकवाड, महिला नेत्या कल्पना दोंदे, माया कांबळे, श्याम वटकर मुंबई, आदर्श सावंत, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष छत्रपती संभाजी नगर jilha अध्यक्ष संदीप गायकवाड, कामगार नेते विजय वाहुळे, राजाभाऊ गांगुर्डे, पत्रकार सतीश केदारे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा नेते तुषार वाघ, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू भाऊ बागुल, वाल्मीक खरात,प्रमोद केदारे, रमाबाई दिवेकर, सुनीता गांगुर्डे, चैताली सोनवणे, विजय गायकवाड, शैलेंद्र खंडागळे, दिलीप अहिरे, कामगार नेते प्रकाश नाना पगारे, समाधान शिंदे, हरी भाऊ अंबापुरे, विजय पगारे, कपिल तेलोरे, अंबादास बावस्कर, बाबासाहेब दिवेकर, सुनील भालेराव, सुनील साळवे, मारुती घोडेराव, अँड.पुष्पक जगताप, आतिश भाई कांबळे, भाई गांगुर्डे, कैलास पवार, संजय सानप, कमलबाई चंद्रमोरे, सुरेश दोंदे, कचरू बागुल, नंदू काळे, दर्शन इंगळे, वाल्मीक पठारे, दादासाहेब गांगुर्डे, दादासाहेब शिंदे, नितीन देवरे, बाळासाहेब भोये, उमेश पिंगळे, शैलेश बाविस्कर, सनी माइनकर, संतोष राजगुरू आदी मान्यवर उपस्थितीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com