Top Post Ad

ZPnews अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेची बैठक जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाली. बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके डिजिटल स्वरूपात अद्ययावत करण्याबाबत, त्यामध्ये सर्व महत्त्वाच्या सेवा नोंदी अचूकपणे समाविष्ट करण्याबाबत आणि सेवा विषयक प्रक्रियांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

याशिवाय आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना १०-२०-३० लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचे संघटनेच्या प्रतिनिधींनी विशेष कौतुक केले. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नियमित संवाद व्हावा यासाठी अशा बैठका दर तीन महिन्यांनी (त्रैमासिक) आयोजित करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेशी संबंधित गट विमा, भविष्य निर्वाह निधी, सेवा विषयक प्रकरणे तसेच कर्मचारी हिताच्या विविध बाबींमध्ये प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दल संघटनेच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करून सर्व विभागांचे कौतुक केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी जिल्हा परिषद प्रशासन कर्मचारी हिताच्या सर्व प्रश्नांबाबत संवेदनशील असून सेवा विषयक प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्तीविषयक प्रकरणे प्राधान्याने आणि तातडीने निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी संवादातून सोडविण्यावर प्रशासनाचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष साबळे, केंद्रीय उपाध्यक्ष अनिल धांडे, सहसचिव जनार्धन राऊत, तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक साळवे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढे, दिव्यांग विभागाचे प्रदेश सचिव शिवाजी बिबराळे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष राहुल नगराळे, सेवानिवृत्ती विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर भोईर यांच्यासह कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना व कर्मचारी कल्याण महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत विविध कर्मचारी हिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन प्रशासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये समन्वय अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com