. सर्व केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चा द्वारा आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी देशव्यापी जेलभरो आंदोलनाचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स नेतृत्वात मुंबईत एकूण 5 ठिकाणी आंदोलन झाले. एस व्ही रोड अंधेरी, दफ्तरी रोड मालाड पूर्व, रत्ना हॉटेल चौक गोरेगाव पश्चिम, महाराष्ट्र नगर मानखुर्द, भांडुप पश्चिम येथे तसेच दादर हिंदमाता संयुक्त आंदोलनात सुमारे 2000 हून कार्यकर्त्ये सहभागी झाले होते. यावेळी अनेकांना अटक करण्यात आली.
अंधेरी येथील कार्यक्रमाची सुरुवात अंधेरी पक्ष कार्यालय येथून रॅली ने सुरू झाली 300 हून फेरीवाले, नाका कामगार, पक्ष कार्यकर्ते, सफाई कामगार, महिला उपस्थित होते. एस व्ही रोड येथे पोलिसांनी अटकाव केल्यावर तेथे धरपकड होत शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. याचे नेतृत्व सिटू जिल्हा अध्यक्ष के नारायणन, पक्ष तालुका सचिव चंद्र्कांत बोजगर, कमल रावत, रुहुल अमिन, मेहबूब पटेल, अंजु दवे, माधुरी बोजगर, अॅंथनी ग्रॅब्रियल, नरसिंहा उपारी, मुकेश शर्मा यांनी केले.मालाड पूर्व दफ्तरी रोड येथे 400 हून फेरीवाले व 40 हून बांधकाम कामगार आपला संपूर्ण धंदा बंद ठेवत उपस्थित होते. सरकारच्या शेतकरी-कामगार- फेरीवाला – बांधकाम कामगार विरोधी धोरणांचा खरपूस समाचार यावेळी उपस्थितींनी घेतला. याचे नेतृत्व पक्ष जिल्हा सचिव कॉ शैलेन्द्र कांबळे, राजेश आर्य, जमूनाप्रसाद गुप्ता, कल्पनाथ भगत,राजेंद्र जाधव, प्रमोद गुप्ता, रविंद्र अवघडे, लाली गुप्ता, बंटी जायसवाल, मयूरी नाडकर, दिनेश गुप्ता इत्यादि व शेकडो फेरीवाल्यांनी केले. यावेळी पी पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांची भेट घेवून आपल्या मागण्याबाबत चर्चा करण्यात आली.
गोरेगाव पश्चिम रत्ना हॉटेल चौक एस व्ही रोड येथे 80-90 फेरीवाल्यांच्या उपस्थित सुरूवातीला जवळपास 1 तास निदर्शने तर नंतर 71 लोकांना अटक करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले. निदर्शनाचे सूत्रसंचालन शाखा उपाध्यक्ष कॉ छबिनाथ यादव यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शन शाखा सचिव तसेच नगर पथविक्रेता समिती सदस्य कॉ हरिचरण चौहाण यांनी केले. फेरीवाल्यांच्या समस्यांसोबत चार श्रम संहिता रद्द करा, शेतीमाला हमी भाव द्या, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचे खाजगीकरण थांबवा यांसह फेरीवेयला कायदा अंमलात आणा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कॉ हरिचरण यांच्या प्रमुख मार्गदर्शना नंतर 71 फेरीवळ्यांनी स्वतः ला अटक करून घेतली. यावेळी हरिचरण चौहाण, छबिनाथ यादव, अनिस शेख, लल्लन यादव, चंद्रप्रकाश यादव, ताराबाई, सलीम पटेल, दशरथ गुप्ता, इसरावती चौहान, जगगू पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र नगर मानखुर्द येथील आंदोलनात 200 अधिक फेरीवाला, अंगणवाडी कर्मचारी, घर कामगार, आशा कर्मचारी यात 10 पुरुष वगळता ईतर सर्व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नेतृत्व कॉ आरमायटी इराणी, कॉ वसंत खंदारे, कॉ रेखा देशपांडे, कॉ संगीता कांबळे यांनी केले. सर्वन्ना अटक करून ट्रोम्ब पोलिस स्टेशन येथे घेवून जाण्यात आले.
भांडुप येथे संघर्ष कार्यालय येथून एक व सीएट कंपनी येथून एक अशा दोन रॅली भांडुप स्टेशन येथपर्यंत काढण्यात आल्या. एकूण 250 हून अधिक कामगारांचा सहभाग होता. कॉ डॉ विवेक मोण्टेरो, कॉ सईद अहमद, कॉ डॉ एस के रेगे, कॉ सुगंधी फ्रांसिस, कॉ शैलेन्द्र चौहान यांनी मार्गदर्शन केले. कॉ के आर रघु, कॉ हेमकांत सामंत, कॉ पी एम वर्तक, कॉ संगीता सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दादर हिंदमाता येथे झालेल्या संयुक्त आंदोलनात 30-35 फेरीवाले उपस्थित होते. यांचे नेतृत्व कॉ सोन्या गिल, कॉ त्रीशीला कांबळे, कॉ प्रमिळा मांजलकर, कॉ रामलखन यांनी केले. भारतमाता लालबाग, मानखुर्द,दफ्तरी रोड मालाड पूर्व,रत्ना हाॅटेल गोरेगाव पश्चिम, अंधेरी रेल्वे स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते.

0 टिप्पण्या