काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी COEP कॅम्पसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या फी वाढ आणि स्कॉलरशिपच्या प्रलंबित समस्यांवर मुलाखती (बाईट्स) घेतल्या होत्या. या वार्तांकनामुळे महाविद्यालयाची नाहक बदनामी झाल्याचा दावा COEP प्रशासनाने केला. तसेच विनापरवाना परिसरात प्रवेश केल्याचा आरोप करत प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली. या कार्यक्रमाच्या आधी कॅम्पसमध्ये भाजपची ABVP आणि काँग्रेसची NSUI यांच्यात वाद झाला होता.
विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले खरे प्रश्न दाबण्यासाठी आणि राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मत अनेक राजकीय नेते आणि पत्रकार संघटनांनी व्यक्त केले आहे. मंदार गोंजारी यांच्यावर झालेल्या या कारवाईविरोधात पत्रकार संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पोलिसांनी ही तक्रार मागे घ्यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि रोहित पवार यांसारख्या विरोधी नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी मंदार गोंजारी (जे प्रतिष्ठित रामनाथ गोएंका पुरस्कार विजेते पत्रकार आहेत) यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली असून, "सत्य मांडणे हा गुन्हा आहे का?" असा सवाल सरकारला विचारला आहे.मुंबई मराठी पत्रकार संघाने केला तीव्र शब्दांत निषेध- घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे, संबंधित व्यक्तींशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे जनतेसमोर आणणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे पत्रकाराचे मूलभूत कर्तव्य आहे. पत्रकाराने विद्यार्थिनींची मुलाखत घेणे किंवा त्यांनी मांडलेल्या समस्या जनतेपर्यंत पोहोचवणे यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असून माध्यम स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वतंत्र आणि निर्भय पत्रकारिता हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पत्रकारांनी केलेल्या वृत्तांकनाबाबत कोणाला आक्षेप असल्यास त्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्ग उपलब्ध आहेत. मात्र पत्रकाराच्या नियमित व्यावसायिक कर्तव्याला गुन्हेगारी स्वरूप देऊन त्याच्यावर FIR दाखल करणे हा पोलिसी खाक्या पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार मंदार गोंजारी यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तातडीने फेरविचार करून मंदार गोंजारी यांच्याविरोधात दाखल केलेली FIR त्वरित मागे घ्यावी, अशी आमची ठाम मागणी आहे. तसेच पत्रकारांना त्यांचे व्यावसायिक कर्तव्य निर्भयपणे पार पाडता येईल आणि अशा प्रकारच्या कारवाईमुळे माध्यम स्वातंत्र्यावर कोणताही दबाव निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.बीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या FIR चा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र शब्दांत निषेध करीत आहे.
सत्य समोर आणणं हा पत्रकारितेचा धर्म आहे आणि हा धर्म जपल्याबद्दल एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर सीओईपी प्रशासनाने गुन्हा दाखल केला. तो कुणाच्या दबावामुळं दाखल केला हे यथावकाश पुढं येईलच पण हा गुन्हा नाही तर संबंधित पत्रकाराच्या पत्रकारितेला मिळालेलं हे मेडल आहे, असं मी मानतो..! म्ही सर्वजण पत्रकार मंदार गोंजारी यांच्या पाठीशी आहोत..! कोणत्याही दबावाला न घाबरता हुकुमशाही वृत्तीच्या नाकावर टिच्चून भविष्यातही असंच सत्य मांडत रहा..! आमदार रोहित पवार

0 टिप्पण्या