दादर रेल्वे स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर करण्यात यावे साठी थेट प्रधानमंत्र्याना घेराव घालणार. असे अखिल भारतीय आदीवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दि ना उघाडे यांनी आज मुंबईत जाहीर केले. या मागणी करीता आजपर्यंत विविध स्वरूपाची गल्ली ते दिल्ली पर्यंतही जनआंदोलने करण्यात आलीत मात्र तत्कालीन सरकारने व विद्यमान महायुतीच्या सरकारकडूनही दादर रेल्वे स्टेशनचे नामांतर करण्यात आले नाही, या बाबतीत सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत असल्याचे उघाडे म्हणाले.
भारताचे पंतप्रधान व तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाशीत केलेल्या पूस्तकावरील छायाचित्रात डॉ. बाबासाहेबांच्या विषयी असलेले प्रेम, निष्ठा, श्रध्दा, आपुलकी, आदर व भावना दिसत आहे. पुस्तकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन दादर रेल्वे स्टेशनचे नामांतर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तात्काळ पावले उचलावीत, असे पत्र संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, चंद्रशेखर बावन्नकुळे, संजय शिरसाठ यांना देण्यात आले असल्याचेही उघाडे यांनी सांगितले. प्रधानमंत्र्यानी नुकताच देवेद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याच्या कारभारचा सर्वेसर्व अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे या महायुतीच्या सरकारकडून या दादर रेल्वे स्थानकांचे नामांतर करण्यात विलंब होणार नाही अशी आशा व उघाडे यांनी व्यक्त केली.
या मागणी सोबतच महाराष्ट्र शासनाकडे आदीवासींच्या जमीनी बिगरआदीवासींनी खोटे नाटे कागदपत्र करून जमीन खरेदी केल्या त्या रद्द करण्यात याव्या. तसेच नागपुर मुंबई समृध्दी महामार्गासाठी आदीवासीच्या भुसंपादीत केलेल्या जमीनीचा मोबदल्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून वंचीत लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावे. तसेच महीलांवरती होणा-या अत्याचार करणारा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यातील सर्व आदीवासी आश्रम शाळेत व इतर हॉस्टेलचे सर्वे करण्यात यावे व त्यांना नागरी सुविधा देण्यात यावी. गडचिरोली जिल्हातिल आदीवासी वस्तीगृहात सर्प दंशाना मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियांना आर्थिक सहाय देण्यात यावे अशी मागणीही आज महाराष्ट्र शासनाकडे यावेळी उघाडे यांनी केली.
मुंबई मराठी पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय आदीवासी सेनेचे केंद्रीय सरचीटणीस जगन जोशी, प्रदेश संपर्क प्रमुख बुधा मधे. ठाणे जिल्हा प्रमुख राजाभाउ ठाकरे, जळगाव जिल्हा प्रमुख ज्योती कोळी, केंद्रीय सदस्य इंदुबाई पवार, परभनी जिल्हा प्रमुख राजु करडीले, धुळे जिल्हा सुरेश कोळी, नाशिक जिल्हा पुष्पराज भोये, तरना छोहार दिकीप गार शुक्सीराम गती प्रदेश आध्य अंगन राहत, दसरक खिन्छ (मश्रा बा दुबई झुण्डे पुष्या धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

0 टिप्पण्या