Top Post Ad

S.T. महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाकडून जाहिर निषेध

 गौरी- गणपती सणासाठी ग्रुप पद्धतीने आपल्या गावी जाण्याऱ्या गणेशभक्त प्रवाश्याना अतिरिक्त ३०% प्रवासी भाडे आकारले जाणार आहे. यापूर्वी दिनांक १७/०७/२०२६ पासून १३. ५% कायमस्वरूपी प्रवासी भाडे वाढ करण्यात आली होती. आता गौरी-गणपती सणास ग्रुप पद्धतीने गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाश्याना कायम स्वरूपी झालेली १३. ५०% प्रवासी भाडे वाढ अधिक अतिरिक्त ३०% प्रवासी भाडे वाढ मिळून ४३. ५०% भाडे वाढ सोसावी लागणार आहे. या भाडेवाढीचा गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाकडून जाहिर निषेध आज मुंबईत करण्यात आला. याबाबत मुंबई मराठी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत  संघाचे कार्याध्यक्ष दीपक मा. चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 परिवहन मंत्री तथा अध्यक्ष एस. टी. महामंडळ म्हणतात "गणेशोत्सव हा केवळ सण नसून कोकणवासियांच्या श्रद्धा, संस्कृती आणि भावाविश्वाचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही नफा- तोटा याचा विचार न करता प्रवाश्याना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एस. टी. कटीबद्ध आहे." आणि  मान. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी गौरी-गणपती सणास ग्रुप पद्धतीने गावी जाणाऱ्या प्रवाश्याना ३०% अधिभार लावला आहे. १७/०७/२०२६ रोजी  कायम स्वरूपी केलेली १३.५०% प्रवासी भाडे वाढ  आणि आता ३० % अतिरिक्त प्रवासी भाडे वाढ करून एस. टी. महामंडळाने ४३.५०% वाढीव भाड्याची भेट गणेशभक्तांना दिली आहे.   " प्रवाश्यांच्या सेवेसाठी " असे म्हणणारी एस. टी. प्रवाश्यांची सेवा करते की प्रवाश्याना लुबाडते? " प्रवासी आमचे दैवत " असे म्हणणारी एस. टी. ४३.५०% प्रवासी भाडे वाढ करून  गणेशभक्त प्रवाश्याना का ओरबाडते? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आला. 

.    प्रवासी संघाच्या माध्यमातून ७०० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन झाले असून सदर नियोजन एस टी महामंडळाकडे दिले आहे. एस. टी. च्या नियोजना प्रमाणे ग्रुप बुकिंग १ ऑगस्ट पासून व्हायला पाहिजे होते. पण ग्रुप धारकांना ३०% अतिरिक्त भेट एस. टी. महामंडळाकडून द्यायची होती.  त्यामुळे ग्रुप बुकिंग २०/२२ दिवस पुढे ढकलावे लागले.ही अतिरिक्त प्रवासी भाडे वाढ केल्याची माहिती जाहीर पणे किंवा प्रसिद्धी माध्यमातून देण्यास व्यवस्थापकीय संचालक यांची हिम्मत झाली नाही, म्हणून अंतर्गत सूचना देऊन ग्रुप बुकिंग करण्यासाठी गेलेल्या प्रवाश्याना प्रवासी भाडे वाढीचा झटका दिला.   गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाने याचा जाहीर निषेध करून ग्रुप आरक्षण थांबाविले. मान. प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष एस. टी. महामंडळ यांना निवेदन दिले असून त्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली आहे. त्याच प्रमाणे मान. उदय सामंत, पालक मंत्री रत्नागिरी जिल्हा यांचीही भेट घेऊन निवेदन दिले आहे. ३०% अतिरिक्त प्रवासी भाडे वाढीचा मंत्री महोदय फेर विचार करतील अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. आणि तसे न केल्यास  तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com