मुंबई : IIT बॉम्बे येथील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाने काल हळहळ व्यक्त होत असतानाच एका भावनिक प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधले. आपला मुलगा गमावलेल्या आई-वडिलांच्या आक्रोशाने परिसरातील वातावरण सुन्न झाले होते. या कठीण काळात कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे कार्यकर्ते कुटुंबाच्या आधारासाठी अहोरात्र उभे राहिले.
मिळालेल्या माहितीनुसार CJP चे प्रणय अहिरे, कुणाल कामेरकर, चैताली दोशी, विजय पाडळे, अँथनी डिसोझा, रूपाली होडे आणि प्रथमेश रणदिवे , विनोद कांबळे हे काल IIT बॉम्बे येथे उपस्थित होते. त्यांनी मृत विद्यार्थ्याच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मध्यस्थी करत कुटुंबाची समजूत काढली. चर्चेअंती पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास CBI कडे वर्ग केला जाईल असे लेखी पत्र कुटुंबाला देण्यात आले. पोलीस उपायुक्त मनोज शर्मा यांनी स्वतः विद्यार्थ्याच्या वडिलांशी चर्चा करून निष्पक्ष आणि सखोल तपास केला जाईल आणि या प्रक्रियेत कुटुंबाला सहभागी करून घेतले जाईल असे सांगितले.
मात्र समाधान अजूनही अधुरेच आहे. वडिलांनी प्रशासनाकडे पाच मागण्या केल्या होत्या, त्यातील केवळ एकच मागणी मान्य करण्यात आली आहे. मृतदेह ताब्यात घेताना वडिलांनी व्यथित होत सांगितले की आम्हाला न्याय मिळालेला नाही. दोन-तीन दिवसांत मी पुन्हा मुंबईला येऊन या व्यवस्थेला जाब विचारणार आहे. सध्या CJP ची संपूर्ण टीम या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
.jpg)
0 टिप्पण्या