Top Post Ad

BMC राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) कामगार कर्मचारी आक्रमक

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारीका, परिसेविका, तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक, शिक्षक आणि महापालिकेतील सर्व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी समन्वय समिती प्रयत्न करीत आहे. काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकार किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासन जाणुनबुजून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे म्हातारपणी निरनिराळ्या आजारांना तोंड देताना पेन्शन नसेल तर खर्चाची तजवीज कशी करणार हा यक्ष प्रश्न महापालिकेतील समस्त कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेने कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दि. ५ मे २००८ पासून परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी दि. ९/०९/२०१० रोजी परिपत्रक काढण्यात आले. सदर परिपत्रकामध्ये 'राज्य शासन त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सदर योजनेत वेळोवेळी ज्या सुधारणा करेल, त्याच धर्तीवर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी बदल करण्यात येतील व ते संबंधित कर्मचाऱ्यांना बंधनकारक राहतील.' असे नमुद केले आहे. मुंबई महापालिकेने मान्य केल्याप्रमाणे वेळोवेळी महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर अनेक बदल कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेमध्ये केलेले आहेत. उदा. कुटुंब निवृत्ती वेतन/दिव्यांगत्व निर्वाह वेतन लागू करणे आणि संबंधित कामगारांना ग्रॅच्युईटी देण्याचा निर्णय लागू करणे. परंतु 'दि. २/०२/२०२४ रोजीचा शासन निर्णय परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या दिनांकापूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.' व 'दि. २०/०९/२०२४ आणि दि. ६/०५/२०२६ रोजीचा शासन निर्णय एकीकृत निवृत्ती वेतन योजना आणि / किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना / राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यापैकी एक निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा विकल्प कर्मचाऱ्यांना देणे' या शासन निर्णयाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने आपल्या कामगार, कर्मचाऱ्यांसाठी केलेली नाही.

म.न.पा. प्रशासनाने डीसी-१ कर्मचाऱ्यांचे १०% व म.न.पा.चे १४% प्रमाणे अंशदायी निवृत्ती योजनेमध्ये कापून घेण्यात आलेला निधी रुपये ६,२३९.०८ कोटी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्याच्या अनुषंगाने दि. १५/०९/२०२६ रोजी मा. स्थायी समितीने ठराव क्र. ९८९ मंजूर केलेला आहे. सदर ठराव मुंबई महापालिकेच्या महासभेत मंजूरीसाठी दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी विषय क्र. २० अन्वये ठेवण्यात आलेला आहे, असे समजते. महाराष्ट्र शासनाने निवृत्ती वेतनाच्या अनुषंगाने पारित केलेले दि. २०/०९/२०२४ आणि दि. ६/०५/२०२६ च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यातील एक निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा विकल्प निवडता यावा, यासाठी म.न.पा. च्या कामगार, कर्मचारी आणि संघटनांबरोबर चर्चा करून याबाबतचा निर्णय घेणे आवश्यक आहे. जुनी पेन्शन तर सोडाच उलट कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता म.न.पा. प्रशासनाने एकतर्फीपणे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) लागू करण्याचा निर्णय घेऊन कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारीका, परिसेविका, तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक, शिक्षक आणि महापालिकेतील सर्व कर्मचारी यांचा गळा घोटण्याचे काम करीत आहे. जर का सुमारे ६.२०० कोटी वेगवेगळ्या वित्तीय संस्थांमध्ये गुंतविण्यात आले तर एकाही कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार नाहीत. म्हणून पशासनाने आणलेला हा एकतर्फी ठराव सभागृहामध्ये मंजूर करण्यात येऊ नये. सदर ठराव सभागृहामध्ये मजुर झाल्यास कोणत्याही क्षणी मुंबई महापालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी, अधिकारी तीव्र संघर्ष करतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही म.न.पा. प्रशासनावरच राहील, असा इशारा समन्वय समितीमधील सर्व संघटनांच्या नेत्यांनी दिलेला आहे.

कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान लक्षात घेऊन प्रथमतः समन्वय समितीच्या सर्व नेत्यांसमवेत बैठक आयोजित करून चर्चा करण्यात यावी. कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारीका, परिसेविका, तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक, शिक्षक, महापालिकेतील सर्व कर्मचारी आणि समन्वय समिती यांचा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांस तीव्र विरोध/नकार आहे.

म.न.पा. प्रशासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) रद्द करून जुनी पेन्शन योजना, लागू करावी तोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर स्वतःची सुधारीत जुनी पेन्शन योजना म.न.पा.च्या सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना लागू करावी. तसेच दिवाळी सणापूर्वी समस्त कामगार, कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, परिचारिका, परिसेविका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्नीशमन दलातील कर्मचारी इत्यादी कायम कामगारांबरोबर महानगरपालिकेतील विविध खात्यातील कंत्राटी, रोजंदारी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरोग्य खात्यातील कंत्राटी कामगार, सी.टी. सी. बोरीवली रुग्णालयातील कर्मचारी, आर.सी.एच.-२, एनयुएचएम कर्मचारी, मुंबई एड्स कंट्रोल सोसायटी कर्मचारी, बालवाडी शिक्षिका व मदतनीस, अंशकालिक कर्मचारी, स्वच्छ मुंबई अभियान मधील कंत्राटी कामगार, सर्व समग्र शिक्षा अभियान कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी, प्लाझमा के.ई.एम. युनिट कर्मचारी तसेच आरोग्य खात्यातील स्वयंसेवी आरोग्यसेविका (सी.एच.व्ही.) यांना माहे ऑक्टोबर २०२६ वेतनाबरोबर रु. ५०,०००/- सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वा. पासून महापालिका मुख्यालय येथे ठिय्या आंदोलन करणार आहेत. जर का चर्चेने प्रश्न सुटला नाही तर सदर मोर्चामध्ये तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल.

समन्वय समितीचे प्रमुख नेते श्री. बाबा कदम, श्री. वामन कविस्कर, श्री. अशोक जाधव, श्री. शशांक राव, श्री. दिवाकर दळवी, श्री. रमाकांत बने, श्री. रंगनाथ सातवसे, श्री. के. पी. नाईक, श्री. नवनाथ घाडगे, श्रीम. त्रिशिला कांबळे, श्री. उमेश भोयर, श्री. हेमंत कदम, श्रीम. कल्पना गजुला, श्री. सी. एस. गजुला, श्री. प्रकाश जाधव, श्री. यशवंत धुरी, श्री. संजय यशवंत कापसे, श्री. देविदास लोखंडे, श्री. प्रकाश तळेकर, श्री. दिपक भांबडे, श्री. चंद्रकांत जाधव, श्री. संजय सावंत आणि इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी या सर्वांच्यावतीने प्रसिध्द पत्रक काढण्यात आलेले आहे.


आपले,


म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई दि म्युनिसिपल युनियन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मुंबई


म्युनिसिपल नर्सिंग अॅण्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन, मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई


Badha


म्युनिसिपल मजदूर संघ हिंदुस्तान कर्मचारी संघ महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार/कर्मचारी सेना मुंबई फायर सर्व्हिसेस युनियन नबिल नर्सिंग युनियन बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियन


म्युनिसिपल श्रमजीवी कर्मचारी/कामगार सेना, मुंबई मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना


बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभा मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना


मुंबई म्युनिसिपल ऍण्ड खाजगी ऊर्दू टिचर्स युनियन आणि महापालिकेतील इतर सर्व कामगार संघटना




मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समिती




"बाळ दंडवते स्मृती" २३७-२३९, ना. म. जोशी मार्ग, बावला मस्जिद समोर, मुंबई १३. दूरध्वनी : ४८२६२३९९




म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई




दि म्युनिसिपल युनियन




म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मुंबई




म्युनिसिपल नर्सिंग अॅण्ड पॅरामेडिकल स्टाफ युनियन, मुंबई




म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन, मुंबई




म्युनिसिपल मजदूर संघ




हिंदुस्तान कर्मचारी संघ




महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार/कर्मचारी सेना




मुंबई फायर सर्व्हिसेस युनियन




नोबेल नर्सिंग युनियन




बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियन




म्युनिसिपल श्रमजीवी कर्मचारी/कामगार सेना, मुंबई




मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना




बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभा




मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना




मुंबई म्युनिसिपल ऍण्ड खाजगी ऊर्दू टिचर्स युनियन




आणि महापालिकेतील इतर सर्व कामगार संघटना




पत्रकार परिषद :-




बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६, दुपारी ३.०० वा.




स्थळ : डहाणूकर सभागृह, मुंबई मराठी पत्रकार संघ, बोरिबंदर, मुंबई- ४०० ००१




कृपया प्रसिद्धीसाठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com