Top Post Ad

विठ्ठलवाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

भारतीय बुद्ध सासन सभा (मुंबई), शाखा विठ्ठलवाडी यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होली होरायझन स्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष कदम होते.

कार्यक्रमास भारतीय बुद्ध सासन सभा (मुंबई)च्या निशाताई जाधव, नगरसेविका माया कांबळे, राजू अंकुश तसेच कमलादेवी कॉलेजचे चेअरमन सदानंद तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. यावेळी अरविंद तांबे, शिवाजी कांबळे आणि अॅड. संदीप कदम यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जीवन वाघ यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन समाजाला दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेच्या संदेशाचे महत्त्व वक्त्यांनी विशद केले. बौद्ध धम्माची शिकवण आचरणात आणून सामाजिक परिवर्तन घडविण्याचे आवाहनही करण्यात आले.

यावेळी दिवंगत पँथर सुनील खांबे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभही आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com