मुंबईतील सायनस्थानकाजवळ प्रबुद्ध समता सोसायटी लगत असलेल्या सुमारे १९७० ते ७५ च्या कालावधीपासून असलेल्या जयभीम चबुतऱ्यासमोरील बांधकाम मुंबई महापालिकेने हेतूपुरस्सर हातोडा चालवून त्यावर कारवाई केली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कायदा सुव्यवस्था संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यास कोणतीही पूर्व सूचना महानगर पालिका जी / उत्तर विभाग परिरक्षण विभागाचे अभियंता लुटे यांनी 'जय भीम' चबुतरा समोरील बांधकाम जाणीवपूर्वक तोडून धार्मिक/सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावं असलेल्या चबूतरा हा आंबेडकरी समाजाच्या अस्मितेच प्रतीक या ठिकाणी अस्तित्वात आहे. सदर ठिकाणी गेल्या ४५ ते ५० वर्षांपासून बौद्ध आंबेडकरी समाज संपूर्ण महापुरुष ह्यांच्या जयंती सोहळा व पुण्यतिथी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची जयंती अत्यंत आनंदाने व शांततेत साजरी करीत आहे. दर रविवारी सकाळी १० वाजता बौद्ध पूजा पाठ कार्यक्रम होत असताना त्या ठिकाणी अजतागायत त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशी अथवा फेरीवाले यांना त्रास झाला नाही. सदर कार्यक्रम होत असताना चबूतऱ्यासमोर घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याकारणाने २ बाय २ चा कोणालाही त्रास होणार नाही ह्याची दक्षता घेऊन दिनांक १८/१०/२०२६ रोजी छोटेसे बांधकाम करण्यात आले. याबाबत शिवसेना उ बा ठा पक्षाचे धारावी विभाग संघटक विट्टल पवार यांनी दिनांक १९/१०/२०२६ रोजी तक्रार केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही पूर्व सूचना अथवा शहानीशा न करता धारावी पोलीस ठाण्याची परवानगी न घेता महापालिकेने दिनांक २६/१०/२०२६ रोजी सकाळी १०-३० वाजता सदर बांधकाम तोडक कारवाई केली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.सदर ठिकाणी असलेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अत्यंत आदराने व श्रद्धेने 'जय भीम' चबुतरा उभारण्यात आलेला आहे. या चबुतऱ्याशी आंबेडकरी अनुयायी व बौद्ध समाजाच्या तीव्र सामाजिक व धार्मिक भावना जोडलेल्या असताना जाणीवपूर्वक जय भीम चबुतरा असणारे बांधकाम तोडले/उध्वस्त केले. दुसऱ्यादिवशी २७ तारखेला जी / उत्तर विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त ह्यांच्याशी स्थानिक नागरिकांनी चर्चा केली. " जर का सदर बांधकाम अनधिकृत असल्यामुळे आपण त्याच्यावर तोडक कारवाई केली असेल तर अशाच प्रकारे इतर बांधकाम ६ दिवसात तोडण्यात यावे अन्यथा ६ दिवसानंतर मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी व बौद्ध समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल" असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
सदर बांधकाम तोडण्यामागे दुष्टहेतू (Malafide intention) असून, त्यांनी केवळ द्वेषापोटी व विशिष्ट समाजाच्या/नागरिकांच्या सामाजिक-धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले आहे. असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र असंतोष पसरला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे परिसरातील नागरिकांममध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई न झाल्यास आणि परिसरातील इतर अनधिकृत बांधकाम तात्काळ निष्कासित न केल्यास धारावीकरांतर्फे प्रचंड जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. महानगर पालिका जी / उत्तर विभागाच्या परिरक्षण खात्याचे सहाय्यक अभियंता लुटे ह्यांनी पोलीस खात्याकडे याबाबत कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई केली त्यामुळे कायदा सुव्यवस्थे प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे अशा अधिकारी व राजकीय दबाव आणणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र प्रशासनाला देण्यात आले असून यावर काय कारवाई होते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या