में. लॉयड्स मेंटल्स अॅन्ड एनर्जी च्या एम.आय.डि.सी. घुग्घूस, चंद्रपूर, या प्रकल्पाद्वारे घातक वायू, रासायनिक घन कचरा व जल प्रदूषण प्रचंड प्रमाणात होत आहे. तरी या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. यासाठी २६ ऑक्टोबर पासून आझाद मैदान मुंबई, इथे अन्नत्याग जनआंदोलन करण्यात येत आहे. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोहनदास धोंडूजी राजूरकर, वामण बापूजी राजूरकर, बंडू धोंडूजी राजूरकर, रामरतन बापूजी राजूरकर, सुधाकर मल्हारी ठाकरे, नितेश पांडूरंग ठाउरी, राहनार उसगाव तह. जिल्हा चंद्रपूर, हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ योग्य तो न्याय न दिल्यास संपूर्ण कास्तकार अन्नत्याग जनआंदोलन करणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांनी आझाद मैदान येथे आंदोलनादरम्यान जाहिर केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत में. लॉयड में टल्स व एनर्जी लि. घुग्घुस या लोह कारखान्याची पाहणी प्रादेशिक अधिकारी, तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी, सुशिल कुमार राठोड, व क्षेत्रअधिकारी नंदकुमार लोंगटे व स्पनिल लिंगडे, यांनी केली. पाण्याचे नमुने व स्लज (Hazardous waste) नमुने घेण्यात आले त्या नमुन्याचा आकडेवारी फेर बदल करून कारखान्याचे व्यवस्थापक यांच्या आदेशानुसार, शेतकरी व संपूर्ण जनतेच्या जिवाचे नूकसान करणारा पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या भ्रष्ट अधिकाराच्या विरोधात उच्चस्थरिय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
१) उसगाव नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य सोडण्यात येत आहे. त्यामुळे वर्धा नदी प्रदूषित झाली आहे. में. लॉयड मेंटल्स अॅन्ड एनर्जी लि. या कारखान्याची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी यासाठी दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन जन आंदोलनाच्या पहिला दिवशी मा. उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी व, तहसिलदार चंद्रपूर, व प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, में. लॉयड मेंटल्स अॅन्ड एनर्जी लि. कारखान्याच्या अधिकारी व संजिवनी पर्यावरण सामाजिक संस्थापक अध्यक्ष राजेश बेले, व कास्तकार मोहनदास राजूरकर, व इतर मान्यवरांच्या उपस्थितीच बैठक झाली.. त्यामध्ये मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबांनी कारखान्याच्या घातक वायू व जल प्रदूषण व घान कचरा व रासायनिक द्रव्य नाल्यामध्ये सोडत असल्यामुळे, निर्देशक सीएसआईआय, राष्ट्रीय पर्यावरण अभियंत्रीक अनुसंधान संस्था (निरी) नागपूर यांच्या मार्फत चौकशी करून कारखान्यावर कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर संस्थापक अध्यक्ष राजेश बेले, व मोहनदास धोडूंजी राजूरकर, व इतर कास्तकार में. लॉयड मेंटल्स अॅन्डएनर्जी लि. घूग्घुस उद्योग परिसरात रासायनिक घन कचरा व रासायनिक जल उसगाव नाल्यामध्ये तत्काळ सोडने बंद करा असे निर्देश दि. २५/८०/२०२६ रोजी देण्यात आले होते. तरी सुध्दा उद्योगाद्वारे रासायनिक घान कचरा व रासायनिक जल नाल्यामध्ये सोडले सुरू आहे. त्यामुळे नाल्याला लागून असलेले १०० एकर पेंक्षा जास्ती शेती प्रदूषित होत आहे. तरी में. लॉयड में टल्स व एनर्जी लि. घुग्घुस लोह खनिज कारखानाद्वारे दररोज लाखो लिटर रासायनिक जल व रासायनिक घान कचरा उसगाव नाल्यामध्ये सोडण्यात येत आहे. आज दि. ०९/१०/२०२६ रोजी पुंन्हा पाहणी केली असला संपूर्ण नाल्यामध्ये रासायनिक घान कचरा व रासायनिक जल सोडण्यामुळे संपूर्ण नाला प्रदूषित झालेला आहे. हा नाला समोर जाउन वर्धा नदीला जोडला जातो. संपूर्ण वर्षा नदी प्रदूषित झाली आहे. व लागून असलेले १०० एकर पेक्षा जास्ती शेतजमिन व शेतपिकाला खूप मोठया प्रमाणात नूकसान झालेला आहे. संपूर्ण शेती प्रदूषित झालेली आहे. त्यामुळे कास्तकारांना उपासमारीची वेळ येत असल्यामुळे संपूर्ण कास्तकार आत्मदहन करणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी मा. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी साहेब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई, सदस्य सचिव जवाबदार राहिल.
२) लोहखनिज प्रकल्पाद्वारे दररोज घातक वायू प्रदूषण पर्यावरण कायद्याचे उल्घन होत आहे. ३) लोहखनिज प्रकल्पाला लागून असलेले शेतामध्ये उसगाव नाल्यामध्ये सोडलेल्या घातक रासायनिक द्रव्यामुळे शेत पिकाला खूप मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. ४) Electro static precritator मधून निघालेली धूळ व इतर निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ जसे की, डोलाचार या उद्योगाद्वारे नियम बाह्य पध्दतीने विकला जातो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण परवानगी (consent to operate) मध्ये विकण्याची परवानगी नाही. ही डस्ट पुढे कोलवाशरी कोळशात मिळविल्या जाते. हा मिलावटी कोळसा पुढे उद्योगामध्ये जाळण्यात येतो. का कारखान्यात सुध्दा ते स्वतः मिक्सिंग केलेला कोळसा रोटरी किलनमध्ये जाळतात. खराब कोळसा जाळल्यामुळे मयदिपेक्षा अधिक वायू प्रदूषण घटक निर्माण होतात व हवेत पसरतात. या उद्योगातील हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची क्षमता कमी पडते.
5) सांयकाळी व रात्री या उद्योगाची हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बंद ठेवली जाते ज्यामुळे खूप मोठया प्रमाणावर धुर, धूळ हवेत उडते व लांब परिसरातील शेती विकांवर पडते. यामुळे नेहमी पिकांचे नुकसान होते. 6) कारखान्यातील esp डस्ट (dolachar) डोलाचार ची वाहतूक व विकी रात्रीला केली जाते. 7) कारखान्यातील सर्व हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा निकामी व पडीक झालेल्या असतात व बहुतांश ठिकाणी त्यांची क्षमता संपलेली आहे. 8) उत्पादन प्रक्रियेतील सांडपाण्यात ग्रीस व कोळसा मिश्रीत असते व सतत नाल्यात सोडल्या जाते जे पुढे नदीत मिळते. 9) म.प्र.नि. मंडळ पर्यावरण मंजुरीच्या अटिंचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. मंजुरी पेक्षा दुप्पट प्रमाणात उत्पादन केले जाते. यामध्ये शासनाचा उत्पादन कर, आय कर करोडो रूपयांनी बुडविला जात आहे. भेसळ प्रतिबंधक कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.
10) कारखान्यात आलेला कच्चा माल व केलेले उत्पादन याच्या खऱ्या नोंदी केल्या जात नाही व शासनाचा महसूल बुडविल्या जातो. या कारखान्ऱ्याचे environment ऑडिट, labour audit, income tax audit केले जात नाही. उत्पादनाचे व उत्पन्नाचे आऑडिट केले जात नाही व उत्पादन कर व आय कर भरले जात नाही. या सर्व प्रकारांमूळे प्रदूषण सतत वाढले आहे. लोह खनिज कारखान्याकडून दररोज घातक वायू हवेमध्ये सोडत आहे. रासायनिक घान कचरा, रासायनिक द्रव्य दररोज सहा महिण्यापासून उसगाव नाल्यात व वर्धा नदीत सोडले जात आहे. यामुळे मानवी जिव वन्यप्राणि, प्राळिव प्राणि, जलजर प्राणि व पक्षी यांच्या जिवाला व आरोग्याला जिवा निर्माण झालेला आहे. अशा लोहखनिज कारखान्याद्वारे पर्यावरण कायद्याचे व शासकीय नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. तसेच म.प्र.नि.मंडळ, चंद्रपूर प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालय प्रादेशिक श्री. तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी. सुशीलकुमार राठोड, क्षेत्राधिकारी नंदकिशोर लोमटे व स्पनिल लिंगडे हे अधिकारी कारखान्याकडून खूप मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण करीत आहेत त्यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, जो पर्यंत संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत अन्नत्याग जन आंदोलन सुरू राहिल असे राजेश वारलुजी बेले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
0 टिप्पण्या