Top Post Ad

News शिवसेनेच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने धम्मचक्र दिना निमित्त बाईक रॅलीचे आयोजन

धम्मचक्र दिना निमित्ताने शिवसेनेच्या वतीने धम्म समता जागृती बाईक रॅली काढण्यात येणार आहे. येत्या 14 तारखेला ही रॅली होणार आहे,  उपसभापती सचिन अहिर रॅलीला झेंडा दाखविणार आहेत तर समारोप सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत,  अशी माहिती माजी आमदार राम पंडागळे यांनी दिली. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचं दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित्त राहणार असल्याचे पंडागळे यांनी सांगितले.


 शिवसेनेच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले आहे. एखाद्या राजकीय पक्षाकडून अशा रॅलीचे बहुदा पहिल्यांदाच आयोजन होतं आहे.  सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष आर्यन मोरे यांनी या रॅलीच्या आयोजनता पुढाकार घेतला असून राम पंडागळे मार्गदर्शक आहेत. मंत्रालाया शेजारील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली सुरु होणार आहे.. सकाळी नऊ वाजता सुरु होणारी ही बाईक रॅली दुपारी बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमी येथे पोहोचणार आहे. चैत्यभूमी येथे जाहीर धम्म सभा होणार असून  प्रमुख पाहुणे म्हणून  उदयोग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पंडागळे आणि आर्यन मोरे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com