अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीने विजय मिळवला असून प्रभाग क्रमांक ३ मधून वंचित बहुजन आघाडी अकोला पूर्वचे महानगराध्यक्ष निलेश भाऊ देव १६०० मतांची आघाडी घेऊन विजयी तर प्रभाग १४ मध्ये चारही उमेदवार जिंकले.
प्रभाग क्रमांक ३
१. निलेश देव
प्रभाग क्रमांक १४
२. उज्वलाताई प्रवीण पातोडे
३. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर
४. पराग रामकृष्ण गवई
५. शेख समशू कमर शेख साबीर
औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३ मधून पूर्ण पॅनल विजयी
१. अ - अमित भुईगळ
२. ब – जरीना जावेद कुरेशी
३. क – करुणा मेघानंद जाधव
४. ड- अफसर खान यासीन खान
लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकित वंचित बहुजन आघाडीचे ५ पैकी ४ उमेदवार विजयी.
१. प्रभाग क्र. १३ अ - अमोल भाऊ लांडगे
२. प्रभाग क्र. ४ अ - सचिन अर्जुन गायकवाड
३. प्रभाग क्र. ७ अ - निकिता रोहित सोमवंशी
४. प्रभाग क्र. २ अ - अंकिता प्रशांत भडीकर
५. प्रभाग क्र. ११ - सुजाता अजनीकर
चंद्रपूर महानगर पालिका
प्रभाग १३
१. लताताई भाव
उल्हासनगर महानगर पालिका
प्रभाग क्र.१८
१. सुरेखा सोनावणे
२. विकास खरात
नांदेड महानगर पालिका
प्रभाग क्र. ७
१. राहुल मधुकर सोनसळे
२. शेख उम्मे अयमन सय्यद रिजवान
३. राजश्री जिजाभाऊ गोडबोले
४. इंजि. प्रशांत विराज इंगोले
प्रभाग क्र. २
५. सुनिता रुपकराव जोंधळे
वंचित बहुजन आघाडीचे विजयी नगरसेवक अकोला – ५, नांदेड –५, लातूर –५, औरंगाबाद – ४, उल्हासनगर – २, चंद्रपूर – १, एकूण -२२
काही अतिउत्साही आंबेडकरवादी आज सांगताहेत AIMIM ला जास्त सीट्स आणि वंचित ला कमी.. पण हा युक्तिवाद अर्धसत्य आहे — आणि अर्धसत्य हे खोट्यापेक्षा जास्त घातक असतं. टायमिंग समजून घ्या!AIMIM महाराष्ट्रात २०१२ पासून सातत्याने निवडणुका लढवत आहे. १०–१२ वर्षांचा अनुभव, ठराविक मतदारसंघ, स्थानिक नेटवर्क — हे सगळं एका दिवसात तयार होत नाही. वंचित बहुजन आघाडीची स्थापना २०१८ मध्ये झाली. अवघे 5, 6 वर्ष आणि स्थानिक पातळीवर पहिलीच निवडणूक.आणि या अवघ्या ५–६ वर्षांत राज्यभर संघटना, वंचितांचा स्वतंत्र राजकीय विचार, प्रस्थापित सत्तेला थेट आव्हान हे यश कमी नाही — हे विरोधकांना धोक्याची घंटा आहे.
वंचितला कमी सीट्स येण्यामागे एक मोठं कारण म्हणजे राजकीय दलाल जे प्रत्येक निवडणुकीत मतं फोडतात, वंचितांच्या लढ्याला कमजोर करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला गहाण टाकतात. हे दलाल कालही होते, आजही आहेत. फक्त चेहरा बदलतो, धंदा तोच! खापर्या महारांचा प्रश्न विचारायलाच हवा! आज जे खापर्या महार “वंचितला कमी सीट्स आल्या” म्हणून बोंबा (ट्रोल) मारत आहेत, तेच लोक निवडणुकीत वंचितविरोधात कुजबुज, प्रस्थापितांच्या मांडीला मांडी आणि निकालानंतर उपदेश हे आंबेडकरवाद नाही हा स्वार्थी राजकीय दुतोंडीपणा आहे.
सीट्सपेक्षा लढ्याची बाजू महत्त्वाची! दलित, आदिवासी, ओबीसी, भटके-विमुक्त, कामगार-शेतकरी यांची स्वतःची राजकीय ताकद उभी करत आहे. कोणाच्या दयेवर किंवा सौद्यावर नाही. ब्राह्मण्यवादी, दलालशाही, खापर्या मानसिकता आणि सत्ताधारी संगनमताविरुद्ध स्वतंत्र राजकारणाचा मार्ग आहे. इतिहास लक्षात ठेवा! बाबासाहेबांचा लढा पहिल्याच निवडणुकीत जिंकण्यासाठी नव्हता, तो पिढ्यान्पिढ्यांचा संघर्ष होता. आज सीट्स कमी असतील, पण उद्या दलालशाही मोडीत निघेल — आणि वंचितच इतिहास घडवेल.

0 टिप्पण्या