मतमोजणीच्या दिवशी निकाल लागायच्या आधी दुपारीच दिवा शहरातील सर्व उमेदवार विजयी झाले असे घोषित करण्यात आले याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना निकाल माहित होता का ? दिव्यात इतक्या भरघोस मतांनी सत्ताधारी निवडून येत असतील तर दिव्यात काहीच समस्या नाहीत असं म्हणायचं का ? मतमोजणीच्या दिवशी तीन ईव्हीएमची सील ओपन होते असं सांगून सुद्धा त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही यामागे कारण काय ? असे सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी या या वेळचा निकाल अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे.
दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेचा निकाल ज्या पद्धतीने लागला आहे ते पाहता या ठिकाणी दिवा शहरातील नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावत नाहीत असा याचा अर्थ काढायचा का? असा सवाल ही ज्योती पाटील यांनी उपस्थित केला आहे.याशिवाय अनेक लोक सांगतात की आम्ही विरोधी पक्षाला मतदान केलं आहे मग ती मतं गेली कुठे? हाही प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. युवा शहरातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर झालीच नाही ती जर विकासाच्या मुद्द्यांवर झाली असती तर एक हाती सत्ता सत्ताधाऱ्यांना मिळाली नसती असा दावाही ज्योती पाटील यांनी केला आहे पैशांचा वापर,यंत्रणेचा वापर वापर करून मिळवलेला हा विजय आहे असेही ज्योती पाटील यांनी म्हटले असून आपल्याला जनतेने ईव्हीएम मधून जी मत दिली आहेत त्या जनतेसाठी मी ठामपणे पुढील काळात उभी राहणार असा विश्वासही ज्योती पाटील यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या