Top Post Ad

NDTV रॉय ह्यांच्याकडून अदानीकडे कसे गेले

राजसाहेब ठाकरे ह्यांनी मनपा निवडणुकीत अदानीकरण होतेय ह्यावर जोरदार टीका केली,हा मुद्दा देशभर चालला...एक केस स्टडी म्हणून NDTV रॉय ह्यांच्याकडून अदानीकडे कसे गेले ह्याचा अभ्यास केला....तर खालील घटनाक्रम समोर आला,.....
२००८ मध्ये जगावर आर्थिक संकट कोसळले होते, त्या काळात NDTV ने ICICI बँकेकडून ३७५ कोटींचे कर्ज घेतले. NDTV चे संस्थापक रॉय यांनी ICICI बँकेचे कर्ज फेडण्यासाठी VCPL या कंपनीकडून २००९ मध्ये ४०३ कोटींचे बिनव्याजी कर्ज घेतले. ​या कर्जाच्या बदल्यात VCPL कधीही NDTV चे २९% शेअर्स घेऊन मालकी हक्क मिळवू शकते, असा तो करार होता. ​२०११-२०१३ दरम्यान या कर्जाची चौकशी झाली होती, त्यामुळे त्यावर पुन्हा चौकशी लावणे योग्य ठरणारे नव्हते. ​२०१४ मध्ये केंद्रात सत्तापालट झाला, तरीही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर प्रश्न उभे करण्याचे कार्य NDTV ने चालूच ठेवले होते.
​NDTV डोईजड होणार हे लक्षात येताच, २०१६ मध्ये FEMA अंतर्गत ED ने कंपनीला नोटीस पाठवली. ​२०१७ मध्ये NDTV ने ICICI बँकेचे ४८ कोटी रुपये बुडवले असा आरोप करत रॉय यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. ​२०२२ मध्ये अदानी यांची या प्रकरणात 'एन्ट्री' झाली. त्यांनी NDTV ला ४०३ कोटींचे कर्ज देणारी मूळ कंपनी 'VCPL' अवघ्या ११४ कोटींना खरेदी केली. ​VCPL ताब्यात येताच अदानी NDTV चे २९% मालक बनले. या कायदेशीर कचाट्यात खचलेल्या रॉय यांनी अखेर माघार घेतली आणि 'ओपन ऑफर' अंतर्गत आपल्याकडील २६% शेअर्स अदानी समूहाला विकले. ​२०२४ मध्ये, म्हणजेच सर्व मालकी हक्क मित्राला मिळाल्यावर, हे प्रकरण पुराव्याअभावी बंद करण्यात आले. ​२०२६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने २०१६ च्या आयकराच्या नोटिसा बेकायदेशीर ठरवून रद्द केल्या. ​अशा प्रकारे, मित्राच्या फायद्यासाठी एका व्यावसायिकाला व्यवसायातून संपवण्यात आले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com