Top Post Ad

भ्रष्टाचाराचा अड्डा... कार्यालय म्हाडा

मुंबई बांद्रा येथील इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ यामधील वरिष्ठ अधिकारी संजीव जयस्वाल (उपाध्यक्ष) व  उमेश वाघ, तसेच तेथील सीओ मिलिंद शंभरकर यांच्याकडून जनतेला होत असलेल्या पिळवणुकीबाबत तसेच म्हाडाचे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा कसा झाला आहे याबाबत समाजसेविका हर्षला गणपत लाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.  गेल्या सहा महिन्यापासून  अकरा कुटुंबीयांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे  यासाठी लढा देत असताना  म्हाडाचे हे अधिकारी जनतेची कशी पिळवणूक करतात याबाबतचे सर्व पुरावे लाड यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रसारित केले. म्हाडामध्ये सुरु असलेला हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी व भ्रष्ट अधिकारी यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन त्यांचे निलंबन होण्याकरिता सर्वांनी या लढ्यात सामील व्हावे असे आवाहनही लाड यांनी केले.  फाईल हरवली चा नावाखाली लोकांची पिळवणूक करून कसे पैसे लुबाडले जातात याबाबतचे पुरावेदेखील यावेळी लाड यांनी सादर केले.  तसेच पात्र नसलेल्या व्यक्तीला वास्तु विशारद म्हणून पात्र दाखवून त्याच्यामार्फत घोटाळेबाज विकासकाची नियुक्ती करून घेणे,  सोलंकी योजनेअंतर्गत लोकांची चालू असलेली फसवणूक, खोटे जीआर पुढे करून लोकांची होत असलेली दिशाभूल याबाबतची सर्व पोलखोल हर्षला गणपत लाड यांनी केली. 

(संपर्क क्रमांक-7218338175)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com