Top Post Ad

मुंबईत समता महोत्सव 2025चे आयोजन

संविधानिक मुल्यांचा प्रचार-प्रसार, संवर्धन, उपयोजन आणि त्या आधारित नीती निर्धारणाचा प्रयत्नासाठी मूल्याधारित नेतृत्व विकासाकरीता 'समता फेलोशिप' उपक्रमाची सुरुवात 'कोरो इंडिया'च्या माध्यमातून २०१९ या वर्षापासून करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये होत असलेले हे कार्य आता देशभरात पोहोचते आहे.  सन २०१९ ते २२ आणि २०२२ ते २४ अशा प्रत्येकी तीन वर्ष मुदतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून दोन्ही राज्यात संस्कृती, शिक्षण, साहित्य, मीडिया, जातिप्रथा आणि लिंगभेद निर्मूलन, धार्मिक आणि सांप्रदायिक सौहार्द, विशेष सक्षम व्यक्तींसाठी कार्य, स्थानिक स्वशासन, जनवकालत, ग्रामीण विकास, मूल्यांबाबत प्रशिक्षण, नेतृत्व विकास, वनाधिकार, ग्राम विकास, विविध कला, संस्था विकास, विविध सामाजिक मुद्यांवर मूल्याधारित अभियान निर्मिती, आदिम तथा अन्य आदिवासी जनजाति विकास, भटके-विमुक्तांच्या प्रश्नांवर कार्य, कारागृह सुधारणा आणि कैद्यांच्या हक्कांवर संशोधन, लोक शाहिरी आणि कला या आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये संविधानिक मूल्यांना घेऊन कार्य होत आहे.


  या कालावधी दरम्यान करण्यात आलेल्या कार्याची मांडणी तथा संविधानिक मुल्यांवर आधारित ग्रासरूट मुव्हमेंटची दिशा आदीवर चर्चा करण्यासाठी मान्यवर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, सुजाण नागरिक आणि आपले सर्व समता फेलोज आदी सर्व मिळून चिंतन-मंथन होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यस्तरीय एक दिवसीय 'समता महोत्सव, २०२५' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य हे 'जागर लोकशाहीचा, उत्सव संविधानाचा' हे आहे.  या 'समता महोत्सवा'चे आयोजन दिनांक २३ मार्च २०२५ रोजी, सकाळी ९.३० ते संध्याकाळी ८.३० वाजता, 'यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई' येथे करण्यात येत आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.

 


   डॉ. रावसाहेब कसबे (प्रख्यात विचारवंत आणि लेखक) प्रा. अंजली मायदेव (ज्येष्ठ समाजकार्य प्राध्यापिका आणि सामाजिक कार्यकर्त्यां). डॉ. सुजाता खांडेकर (संस्थापक-निदेशक, CORO India). हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. समता महोत्सव २०२५ हा खुला मंच आहे, जिथे आपण संवैधानिक मूल्यांचे रक्षण, सामाजिक अन्यायाविरोधात आवाज आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी एकत्र येणार आहोत.

  • संयोजनः समता फेलो अविनाश पोईकर आणि मेघा क्षीरसागर
  • सांस्कृतिक सादरीकरणः नवयान महाजलसा, पुणे
  • महत्त्वाच्या परिसंवाद चर्चाः
  • 1. विविधता, धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधानः आव्हाने आणि पुढील वाटचाल (११:३० ते १:००)
  • • मान्यवर विचारवंतः प्रा. राम पुनियानी, दिशा पिंकी शेख, संध्या नरे पवार, भारत महाराज जाधव, प्रा. सुभाष वारे
  • • पुस्तक प्रकाशनः होय होय वारकरी (मराठी पुस्तक)
  • 2. संवैधानिक प्रणाली: अंमलबजावणी, बळकटीकरण आणि लोकशाहीकरण (१:४५ ते ३:००)
  • • मान्यवरः प्रा. डॉ. चंद्रिका परमार, भीम रास्कर
  • 3. लैंगिक-जातीय भेदभाव आणि शोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल (३:०० ते ४:३०)
  • • प्रमुख वक्तेः प्रा. डॉ. विभूति पटेल, सुनील खोबरागडे, सुरेश सावंत
  • 4. PVTG-आदिवासी आणि विमुक्त भटक्या जमातीः संवैधानिक हक्कांची पुनर्खाज (४:३० ते ६:००)
  • प्रमुख वक्तेः प्रा. नीरज हाटेकर, रजनी पवार, अरुण जाधव
  • 5. लोककला, लोकसंस्कृती आणि लोककथा (६:०० ते ७:००)
  • • प्रमुख वक्तेः संजय सोनवणे (प्रख्यात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते)
  • सांस्कृतिक आणि नाट्य सादरीकरणेः
  • 'अप्पू कुटण को तोल कैसे?' नाटक (कृतार्थ शेगांवकर आणि सार्थक चास्कर)
  • फोरम थिएटर 'चांगभल' ग्रुपची नाट्यप्रस्तुती
  • संविधान सांस्कृतिक जलसा, औरंगाबाद
  • समारोप सत्रः
  • "अभंग ते जलसा आणि तमाशा" (७:३० नंतर)
  • सुप्रसिद्ध शाहिर आणि लोककलाकारः
  • शाहिर शीतल साठे, शाहिर आकाश पवार, राजू चव्हाण, संभाजी टांगले, भास्कर सदाफळे

अधिक माहितीकरिता....
रोहिणी कदम-८१०८२२४११८
कुणाल रामटेके-७९७२४२९६१६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com