Top Post Ad

निर्धार एकच बी.टी.एक्ट 1949 रद्द करा... चला आंदोलनाला गती देऊया...

जर बिहार सरकार आणि पोलिस प्रशासनाला गुन्हा दाखल करायचा असेल तर... १) बुद्धपौर्णिमेच्या दिवशी बोधगया येथील महाबोधी महाविहारात जाऊन तेथे बसवलेल्या कृत्रिम शिवलिंगाची पूजा करणारे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि बुद्धमूर्तीसमोर मोठ्याने मंत्रोच्चार करणारे ब्राह्मण पंडीत यांच्यावर कारवाई करावी कारण बोधगया महाविहार बुद्धीस्ट संस्कृतीचा एक जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वारसा आहे. २) ज्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर अशी पूजा झाली त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. ३) बोधगया मंदिर कायदा समितीच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करावा. ४) त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या बोधगया व्यवस्थापन समितीतील दलाल प्रवृत्तीच्या भिक्षूंवर गुन्हा दाखल करावा. त्यांनी त्यांच्यासमोर ही पूजा कशी होऊ दिली? ते काय करत होते? त्यांनी निषेध का केला नाही? ५) बोधगया मंदिर परिसरात जयश्री रामच्या घोषणा देत होते, तिथे राममंदिर आहे का? अशा गुंडगिरीत सहभागी असलेल्या आणि अराजकता निर्माण करणाऱ्यां सर्व प्रवृत्तींवर गुन्हे दाखल केले पाहिजेत.

   उलट काय झाले.. मागील तीन महिन्यांपासून संवैधानिक पद्धतीने शांततेत महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन करणाऱ्यांनाच मारहाण करण्यात आली इतकेच नव्हे तर भिक्खूंनाच जेलमध्ये टाकण्यात आले.  ज्यानी तिथल्या गावगुंडांचा हा डाव उद्ध्वस्त केला ते भन्ते विनयाचार्य... जे ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणत होते. त्यांनी तिथे कोणतीही प्रतिकूल घटना घडू दिली नाही.  सार्वत्रिक झालेल्या व्हीडीओमधून हे सर्व सिद्ध होत आहे. तरी त्यांना रात्री २ वाजता तुम्हाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचे आहे, असे खोटे सांगून तुरुंगात टाकले.  या सर्व गोष्टी पाहून मनुवादी व्यवस्था किती दुष्ट आहेत हे जाणवते आणि हे देखील स्पष्ट होते की इथले सरकार आणि प्रशासन ज्यावर ब्राह्मणी व्यवस्थेचा प्रभाव आहे ते प्रत्येक गोष्टीचा गैरवापर करून आंदोलन चिरडून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच सर्व बहुजन महापुरुषांनी नेहमीच ब्राह्मणवादावर हल्ला चढवला आहे. 

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन मोडीत काढण्याकरिता प्रत्येक मार्गाचा अवलंब केला गेला. आणि शेवटी आपल्याच लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून हे आंदोलन दडपशाहीने काहीसे मोडीत काढण्याच्या मार्गावर नेण्यात आले. मात्र आपल्यातील काही कट्टर आंबेडकरी निष्ठावंतांनी या आंदोलनाला अधिक तीव्र केले आहे. जोपर्यंत महाबोधी महाविहाराला ब्राह्मणवाद्यांच्या तावडीतून मुक्त होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.  त्यासाठी प्रत्येक बौद्ध अनुयायांने यामध्ये तन-मन-धनाने सहभागी झाले पाहिजे. मनुवाद्यांच्या कोणत्याही अमिषाला किंवा भूलभुलय्याला बळी न पडता आपला निर्धार केवळ एकच, महाबोधि विहारातून ब्राह्मण पंडीत हटाव, बी.टी.एक्ट 1949 रद्द करा. यासाठी चला  महाबोधी महाविहार मुक्ति आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून या लढ्याला अधिक तीव्र करूया... आपल्याला सहभागी होता आले नाही तरी आंदोलनाबाबत गैरसमज पसरवू नका. मनुवाद्यांकडून या गोष्टी सातत्याने केल्या जातील, त्या अधिक आक्रमक करून पसरवल्या जातील. त्यासाठी सोशल माध्यमांचा प्रभावी वापर केला जाईल. आय.टी.सेल मार्फत ते सातत्याने बिंबवले जाईल. मात्र निर्धार एकच बी.टी.एक्ट 1949 रद्द करा यासाठी चला आंदोलनाला गती देऊया...

बोधगया हल्ल्यावरून ठरेल — संविधान की संघराज?"

ज्या दिवशी देशभरातून बौद्ध अनुयायी बोधगयाला आले होते,  त्या पवित्र भूमीवर, जिथे तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली,  तिथेच, गावगुंडांनी 'जयश्रीराम' च्या घोषणा देत भिक्षूंवर आणि धम्म अनुयायांवर अमानुष हल्ला चढवला!
हा हल्ला व्यक्तीवर नव्हता, हा हल्ला होता — संविधानावर!, धम्माच्या तत्त्वांवर!, बौद्ध अस्मितेवर!
भंते विनयाचार्य, जे शिस्तबद्ध शांततेने धम्मप्रवचन करत होते — त्यांना 'शांत राहा' असं सांगण्याची शिक्षा कोणती? त्यांच्यावर खोटं खुनाचा आरोप लावून थेट तुरुंगात डांबलं!
विलास खरात, जे त्या दिवशी घटनास्थळी नव्हते -  त्यांच्यावरसुद्धा FIR?
हा कायदा आहे का? की निव्वळ सूड आणि सत्तेचं रानटी प्रदर्शन?

या हल्ल्यामागे काही माथेफिरू नव्हते —
ह्या कटामागे उभा आहे खुद्द RSS आणि BTMC (Bodhgaya Temple Management Committee)!
RSS चा इंद्रेश कुमार, जो एकेकाळी २२ बाँबस्फोटांमधील आरोपी होता, त्याला बोधगयामध्ये सन्मानाने आमंत्रित केलं जातं… आणि तो बौद्धधर्माला ‘वेदांची शाखा’ म्हणतो?  हा केवळ अवमान नाही — हा फासीवादी अपप्रचार आहे!  २०१३ च्या बोधगया बाँबस्फोट प्रकरणात RSS चं नाव आलं होतं, तो खटला का दाबला गेला? आज पुन्हा RSS बोधगया मध्ये ‘पंडितराज’ लादायला निघाली आहे!  बिहार सरकार, BTMC, राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, आणि RSS हे सर्व मिळून खोट्या गुन्ह्यांत बौद्धांना अडकवत आहेत… आणि खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत!

३१ मे — राज्यभरात शक्तीशाली धरणा आंदोलन!
१५ जून — दिल्लीमध्ये बौद्ध संसद रॅली!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com