Top Post Ad

धारावीकरांना 500 चौ.फु. घर... महापालिका निवडणुकीची चर्चा

धारावी पुनर्विकासाअंतर्गत पात्र नागरिकांना देण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळामध्ये वाढ करत ५०० चौ. फुटांचे घर देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पास (डीआरपी) दिले होते. त्यानुसार डीआरपीकडून यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यास मान्यता मिळाल्यास धारावीकरांना ५०० चौ. फुटांची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. असे वृत्त प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित होताच याचे श्रेय घेण्याकरिता भाजपचेच कार्यकर्ते पुढे सरसावले असल्याने धारावीकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक  महानगरपालिकेच्या  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकरण अधिक चर्चेत कसे येईल यासाठी आटापिटा सुरु असल्याची चर्चा थारावीत रंगली आहे. 

या प्रकरणी सत्यता वेगळीच असल्याचे धारावी बचाव आंदोलन कर्त्यांचे म्हणणे आहे. ५०० चौरस फुटांचे घर फक्त नगरपालिका चाळी/कामगार छावणीत राहणाऱ्यांनाच उपलब्ध असेल. (४०५ वरून ५०० चौरस फुटांपर्यंत वाढवले) उर्वरित पात्र आणि अपात्र झोपडपट्टीधारकांना फक्त ३५० चौरस फूट जागा देण्याची चर्चा आहे. पात्र/अयोग्य व्यक्तींचा खेळ करण्यात येत असून घराच्या बदल्यात घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकान हवे आहे तेही फक्त धारावीत असे येथील नागरिकांचे स्पष्ट मत आहे. आम्ही आमच्या मागण्या समन्वयक मुख्य अधिकारी श्रीनिवास यांना दिल्या होत्या. यासंदर्भात बी.ई.एस.टी. भवनमध्ये एक बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सांगितले की ते खाजगी चाळी आणि बीएमसी चाळींसाठी ५०० चौरस फूट जागेचा प्रस्ताव पाठवतील. आजही धारावी विकास प्रकल्पाचा स्वतंत्र आराखडा जनतेसाठी खुला का करण्यात येत नाही. धारावीकरांना अंधारात ठेवून कोणाचा विकास करण्यात येणार आहे असा सवालही धारावीकरांनी केला आहे. 

मात्र या गोष्टीचे श्रेय घेणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना धारावी बचाव आंदोलनाचे प्रवक्ते अनिल शिवराम कासारे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 2002 पासून धारावी बचाव आंदोलन च्या माध्यमातून आम्ही धारावीकरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून धारावी बचाव आंदोलनाची कायमची 500 चौ. फुटाच्या घराची मागणी होती.. आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आतापर्यंत धारावी बचाव आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते आपापल्या परीने मोर्चे, धरणे, सभा घेऊन सरकारला व धारावी पुनर्वसन प्रकल्प ह्यांना मागणी पत्र दिले. त्या आंदोलनाची दखल घेऊन आज जर सरकार धारावीकराना 500 चौ. फुटाचे घर देण्याचा प्रस्ताव आणि प्रयत्न करत असेल तर ते सर्व श्रेय धारावी बचाव आंदोलन व त्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे, धारावी जनतेचे आहे ... काल उठून येणार आणि कोणतेही आंदोलन न करता, ऱ्याचा हा प्रयत्न नाही किंवा त्यांच्यामुळे झाला हे सुद्धा त्यांनी गृहीत धरू नये.. आईजी च्या जीवावर बाईजी सुभेदार* "ह्या म्हणी प्रमाणे *फुशारकी मारू नये. असे स्पष्ट मत अनिल शिवराम कासारे यांनी व्यक्त केले. 

डीआरपी आणि अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविला जात आहे. या योजनेनुसार झोपडीधारकांना ५००  चौ. फुटांचे घर मिळणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प विशेष प्रकल्प असल्याने राज्य सरकारने पात्र झोपडीधारकांना ४०५ चौ. फुटांचे घर देण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याला विरोध करत ५०० चौ. फुटांचे घर द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनर्वसित इमारतींच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी, कमीत कमी ५०० चौ. फूट क्षेत्रफळाची घरे देण्यासंबंधीचा प्रस्ताव डीआरपी सरकारला कारणमीमांसासह मान्यतेसाठी सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत डीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ५०० चौ. फुटाच्या घरांसंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. त्यानुसार हे वृत्त सर्वत्र पसरवण्यात आले मात्र यामागील वास्तविकता धारावीकरांपासून लपवण्यात येत असून हा सर्व प्रकार महानगरपालिकेच्या निवडणुकांकरिता करण्यात येत असल्याचे चर्चा धारावीकरांमध्ये रंगली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com