Top Post Ad

'BEST आधुनिकीकरण' नाही — ही सार्वजनिक सेवांची कॉर्पोरेट लूट

कधीकाळी मुंबईचं सर्वाधिक शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह सार्वजनिक सेवा मानलं जाणारं बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅन्ड ट्रान्सपोर्ट (BEST) Undertaking आज पूर्णतः पोकळ झालं आहे. मुंबईची लाल जीवनरेखा वयाने किंवा अकार्यक्षमतेने नाही, तर जानबूजून केलेल्या घोटाळ्यांमुळे, गैरसमंजस कंत्राटांमुळे, आणि क्रोनी प्रायव्हेटायझेशनच्या मॉडेलनं रक्तबंबाळ झाली असल्याचा आरोप मुंबई महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका व माजी BEST समिती सदस्या शितल अशोक म्हात्रे यांनी केला आहे.  

मुंबई काँग्रेस कार्यालयात बेस्टच्या खाजगीकरणाबाबत बोलतांना त्या म्हणाल्या. हे Public-Private Partnership नाही हे आहे  Private Profit / Public Risk Model आहे. "आधुनिकीकरण" आणि "शाश्वतता" अशा चमकदार शब्दांमागे, BEST ची संपूर्ण अंमलबजावणीची शक्ती ओरबाडून घेतली गेली आहे. Evey Trans Pvt. Ltd. या कंपनीला २१०० इलेक्ट्रिक बसेससाठी आणि आता नवीन २४०० बसेससाठी दिलेलं Gross Cost Contract (GCC) करार हे सर्वात मोठं धोका-सूचक उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

  • 1. गाड्या वाढल्या, प्रवासी कमी झाले. कार्यक्षमता कोसळली.
  • वर्ष    एकूण बसेस दररोज प्रवासी दर बस प्रति दिवस किलोमीटर     प्रति बस प्रवासी
  • २०१३–१४     ३,६४७ ३४.८ लाख    १८५ किमी    ९४५
  • २०२२–२३     ३,७४६ २२.१६ लाख   १७४ किमी    ५९१
  • ही प्रगती नाही — ही तर नियोजनबद्ध घसरण आहे.
गोंधळाची टाईमलाईन
तारीख घटना
मार्च २०२१    भांडुप येथे वेट-लीज बसला आग लागली
२०२२  वेतन न मिळाल्यामुळे कामगारांचा संप – ३०८ बसेस बंद
२०२३  MP ग्रुपने कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा थांबवली
ऑक्टोबर २०२३      अग्निकांडांनंतर Hansa चा करार रद्द – कायदेशीर अडचणींमुळे सेवा पुनरारंभ रखडले
डिसेंबर २०२४  मोरया ट्रान्सपोर्टचा चालक कुर्ल्यात ९ नागरिकांचा मृत्यू घडवतो
२०२४  JBM GreenKool ने बसेस डिलिव्हरी उशीर केली – कोणतीही दंडात्मक कारवाई नाही.
सुरक्षा, सेवा डिलिव्हरी, वेतन – प्रत्येक ठिकाणी कंत्राटदार अपयशी. पण तरीही वेट-लीज मॉडेलवर प्रश्नच नाही.

  • २०१७–२०२५: एक नियोजित षडयंत्र
  • २०१७: आयुक्त अजय मेहता यांनी BEST ला "अकार्यक्षम" ठरवले, मार्ग बंद केले, सबसिडी थांबवली
  • २६ जुलै २०१९: Bombay Regional Transport Act रद्द — कायदेशीर कणा गळाला
  • २०१९: BEST च्या आर्थिक संकटात ५०० बस्सेस कंत्राटदारांना सुपूर्द
  • २०२०–२३: राजकीय पाठबळातून शेल कंपन्यांना कंत्राटं
  • २०२४: ३,१६८ बसेस पैकी फक्त १,०१२ BEST मालकीच्या – आज फक्त २५० राहिल्या
  • थोडक्यात, BEST लवकरच नावापुरतीच शिल्लक राहील.
 राजस्वाचा काळा विवर: २,१०० कंत्राटी बस्स चालवण्याचा खर्च
४६.८१/किमी × २०० किमी = ₹९,३६२/दिवस/बस (सबसिडी सहित), ₹५६.८१/किमी (शिवाय)
२.८ लाख/माह × २,१०० बस्सेस = ₹५८.८ कोटी/महिना
५८.८ कोटी × १२ महिने × १२ वर्ष = ₹८,४६७.२ कोटी + GST
या आकड्यात डेपो भाडं, टॅक्स, इन्फ्रास्ट्रक्चर खर्च धरलेले नाहीत — जे BEST कडूनच भरले जातात.
दरम्यान, १००% जाहिरात महसूल थेट कंत्राटदाराच्या खिशात.
एकतर्फी जोखीम – सरकार भरते, कंत्राटदार कमवतो
BEST ने दिलेलं आगाऊ भाडं – ₹५.६ लाख प्रति बस (२ महिने)
कंत्राटदाराची सुरक्षा ठेव – फक्त ₹५०,००० प्रति बस
बसची किंमत (सबसिडी नंतर) – ₹८५ लाख
सार्वजनिक जोखीम – कंत्राटदाराच्या तुलनेत १४ पट जास्त
कलम 3.4 वि. 3.5 – न्यायाचा फज्जा
BEST उशीर करेल तर: दंड = सिक्युरिटी डिपॉझिटचा १%/दिवस (कमाल १०%)
कंत्राटदार उशीर करेल तर: दंड = ₹०
काहीही समांतर नाही. उशीर झाला तर फटका जनतेला.
  • भाडं धोरण – विनोदासारखं (कलम 16.1.2)
  • सुविधा आकारलेलं भाडं      प्रत्यक्ष बाजारमूल्य
  • पार्किंग + चार्जर     ₹१/वर्ष ₹१–२ लाख/वर्ष
  • टॉयलेट्स (डिपो)     ₹१/महिना    ₹५,०००–₹१५,०००/महिना
  • युटिलिटी शेड्स      ₹१/चौरस फूट/महा    ₹१००–₹२००/चौरस फूट/महा
  • सार्वजनिक मालमत्ता ‘कागदावर’ मोफत दिली जाते.
  • कलम 24 – 'Change in Law' चा छुपा सापळा
  • कंत्राटदाराचे खर्च ₹२ कोटींनी वाढले → भरपाई मागू शकतो
  • नफा ₹२ कोटींनी वाढला → BEST ने ऑडिट करून सिद्ध करावे लागते
त्रुटी:
“बदल” ही संज्ञा अपूर्ण व अस्पष्ट
पुरावा फक्त BEST ला सादर करावा लागतो
थर्ड पार्टी ऑडिटची कोणतीही सक्ती नाही
कलम 15.9(xvii) – स्पष्ट उल्लंघन

  • करार: कंत्राटदार दुसऱ्याला सब-लायसन्स देऊ शकत नाही
  • वास्तव:
  • मोरया ट्रान्स प्रा. लि. BEST च्या जागेतून अवैधरीत्या ऑपरेट करत आहे, कर्मचारी धमकावत आहे.
  • BEST चं उत्तर? – गप्प बसणं.
  • बसेस वेळेवर न पुरवल्या – तरीही कंत्राट सुरू
  • करार: २,१०० बसेस १२ महिन्यात
  • वास्तव: फक्त ६६५ बस २ वर्षांनंतर
  • दंड: ₹२,०००/दिवस/बस (कमाल ₹२०,०००) — BEST कंडक्टरपेक्षा कमी पगार!
  • ना करार रद्द, ना ब्लॅकलिस्टिंग, ना पारदर्शकता
  • शेवटचं सत्य: BEST चं खाजगीकरण म्हणजे देशातील सर्वात वाईट मॉडेल
BEST जवळ कोणतीही मालमत्ता नाही
  • सर्व टॅक्स, टोल्स, इन्फ्रास्ट्रक्चर खर्च स्वतःच उचलते
  • कंत्राटदार – ना गुंतवणूक, ना प्रशिक्षण, ना जबाबदारी – पण प्रॉफिट १००%!
  • हे 'आधुनिकीकरण' नाही — ही सार्वजनिक सेवांची कॉर्पोरेट लूट आहे.
आमच्या ठाम मागण्या:
सर्व GCC कराराची कलमानुसार चौकशी
BEST च्या आर्थिक जोखमीचं सार्वजनिक ऑडिट
सुरक्षा, वेळेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई
खाजगीकरण थांबवून BEST मालकीत सेवा पुन्हा सुरु करा
BEST चे डिपो जतन करा — त्याचं "मॉनिटायझेशन" थांबवा
BEST ला कंत्राटीकरण नको – स्वामित्व हवं.
BEST ला फुकट प्रसिद्धी नको – खरं पाठबळ हवं.
लाल जीवनरेखा वाचवायची वेळ आली आहे – उद्या उशीर होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com