Top Post Ad

भारत सरकारने बोधगया टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द करुन केंद्रिय कायदा करावा

बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती संदर्भात भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२, २५, २६, २९ आणि ३० अंतर्गत आदेश जारी करुन त्याद्वारे (१) बोधगया टेम्पल अॅक्ट, १९४९ हा असंविधानिक आहे असे जाहीर करावे. कारण तो १९५०च्या भारतीय संविधानातील अनुच्छेद १३शी विसंगत आहे, न्यायसंगत नाही या प्रमुख मागणीसह इतर मागण्याकरिता दि धम्म संहिता अॅक्शन कमिटी ऑफ इंडियांच्या समन्वयकाद्वारा  सर्वोच्च न्यायालयात दिनांक १३ जुलै २०२५ रोजी  अॅड. दिलीप काकडे यांचे नेतृत्वात धम्मसंहिता अॅक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या  मधूकर अर्जुन मर्चडे शशिकांत लुमाजी भालेराव  हरिश्चंद्र मानाजी पवार  डॉ. मुकेश भानुदासजी दुपारे  या  समन्वयकाद्वारे याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेची दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी आद. न्याय. एम. एम. सुंदरेश आणि आद. न्याय. एन. कोटीस्वर सींग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन ती स्वीकारण्यात (Admitted) आली. न्यायालयाने प्रतिवादींना (Respondent) नोटीस काढणे आणि या विषयावरील मुख्य याचिकेबरोबर ही याचिका जोडणे असे आदेश दिलेले आहेत. याबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

  भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२, २५, २६, २९ आणि ३० अंतर्गत आदेश जारी करुन त्याद्वारे (१) बोधगया टेम्पल अॅक्ट, १९४९ हा असंविधानिक आहे असे जाहीर करावे. कारण तो १९५०च्या भारतीय संविधानातील अनुच्छेद १३शी विसंगत आहे. (२) बोधगया टेम्पल अॅक्ट १९४९ रद्द करुन तो बाजूला करण्यात यावा. कारण तो संविधानातील मुलभूत हक्क २५, २६, आणि २९ शी विसंगत आणि अवमानकारक आहे. न्यायसंगत नाही. (३) भारत सरकारला बोधगया टेम्पल अॅक्ट १९४९ रह करावयास सांगण्यात येऊन त्या जागेवर केंद्रिय कायदा करण्यात यावा. (४) भारत सरकारने केंद्रिय कायदा बनवून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण, व्यवस्थापन व प्रशासन बौद्धांच्या ताब्यात द्यावे. (५) बोधगया महाबोधी महाविहाराच्या जागेमध्ये जे अतिक्रमण झालेले आहे ते सरकारने हटवावे. जेणेकरुन तिथे येणाऱ्या जगातील बौद्ध लोकांना पूजा विधी करण्यासाठी अडचण येणार नाही. तसेच बोधगया महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन, नियंत्रण आणि प्रशासन हे धार्मिक, श्रद्धा, विश्वास आणि पूजा यांना धरुन न्याय संगत होईल. (६) भारत सरकारला सांगण्यात यावे की, ज्याप्रमाणे रामजन्मभूमी बाबरी मस्जीद केस मध्ये मुस्लीमांना स्वतंत्र जमीन दिली होती, त्याप्रमाणे हिंदूंना पूजा व धार्मिक कार्यासाठी स्वतंत्र जमीन देण्यात यावी. (७) भारत सरकारला सांगण्यात यावे की, जगातील बौद्ध भीक्खू, बौद्ध अनुयायी आणि सर्वसाधारण लोक यांना बौद्ध धर्माप्रमाणे पूजा विधी करणे याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. कारण बोधगया महाबोधी महाविहार हे युनेस्कोने जागतिक विरासत म्हणून जाहीर केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com