Top Post Ad

डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद लढा देणार

मुद्रित माध्यम आणि दृकश्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधिंच्या प्रमाणेच डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना सरकारने सर्व सवलती द्याव्यात आणि त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद लढा उभारणार, असे प्रतिपादन एस एम देशमुख यांनी रविवारी केले. त्यासाठी सन 1939 पासून कार्यरत असलेल्या व आचार्य अत्रे यांच्यासारख्या अनेक दिग्गज पत्रकारांनी नेतृत्व केलेल्या 'अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे'ने डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसाठी स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे. डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्र असे या संघटनेचे नाव आहे. या संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी, 14 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडले. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभरातून डिजिटल मीडियाचे साधारण 1000 पत्रकार उपस्थित होते. 

यावेळी मंचावर केंद्रिय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मंजूरभाई शेख, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी. लांडगे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, डॉ. मोहम्मद अब्दुल कदीर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. 

या परिषदेत डिजिटल मीडिया मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई विभागासाठी निमंत्रक म्हणून ६ सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. गणेश जगताप, तुषार खरात, परेश मोटे, उदय कासारे, केतन खेडकर, तानाजी कांबळे यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी ठाणे विभागासाठी निमंत्रक सदस्य म्हणून नेहा गायकवाड, अजय मगरे, सतशील मेश्राम, सुनील विश्वकर्मा, संतोष खरात, भुजंग सोनकांबळे यांचा समावेश करण्यात आला.  तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये  सुनील शिंदे, उमेश शेट्ये, तेजस वाघमारे, मारुती मोरे, सुरेश गायकवाड, बाळासाहेब पाटील यांचा समावेश  करण्यात आला. वरील सर्व सदस्यांचे स्वागत व अभिनंदन अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि डिजिटल मीडिया परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल वाघमारे आणि  मुंबईचे अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले.

यावेळी डॉ. भागवत कराड यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी सोडवणूक करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारांच्या आरोग्यविषयक, रेल्वेविषयक व छोट्या-मोठ्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी मुद्रा लोन विषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख वक्ते तुळशीदास भोईटे व रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केले.ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी "ए. आय. आणि मराठी पत्रकारिता", या विषयावर तर डॉ. अनिल फळे यांनी "डिजिटल मीडिया: श्वास महाराष्ट्राचा", या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार, धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, डॉ. मोहम्मद अब्दुल कदीर यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात एस. एम. देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. सरकार अद्यापही यु ट्युबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही. पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्षे झाली. तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही. पत्रकारांच्या पेन्शनचे, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिवेशनाचे प्रास्ताविक बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रकाश भगनुरे यांनी मानले. या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल, नागेश गजभिये, स.सो. खंडाळकर, डॉ, धनंजय लांबे, डॉ. मोहम्मद अब्दुल कदीर, जगन्नाथ सुपेकर, रमेश खोत, यांचा पत्रकारितेतील दीर्घ सेवेबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यु ट्युब चॅनेल व पोर्टलच्या पत्रकार व संपादकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com