Top Post Ad

अखेर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांना जानेवारी महिन्याचा मुहूर्त

महाराष्ट्रातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपुन चार पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे.  प्रशासक नियुक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार राज्य सरकारद्वारे होत आहे  या याबाबत अनेक संस्था संघटनांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र त्यावर अद्याप निर्णय होत नव्हता. डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार वर्षांनंतर न्या. सूर्यकांत आणि न्या. नाँगमेईकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.   ज्यामध्ये   महाराष्ट्रातील  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ४ महिन्यात घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने 6 मे 2025 रोजी दिले. यामुळे गेले काही वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात असतानाच हा कालावधी संपायला आला तरी अद्यापही निवडणुकांबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे.  मुदत आता संपत आली असून एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही. यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला. तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

 सर्वोच्च न्यायालयाने आम्ही दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत निवडणुका का घेतल्या नाहीत, असा जाब राज्य सरकारला विचारला. तसेच आता सप्टेंबर ते डिसेंबर इतका कालावधी तुम्हाला कशासाठी हवा आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली. यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडताना कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सणांचे कारण पुढे केले. आमच्याकडे ईव्हीएम यंत्रे ही नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, सध्या प्रभाग रचनेचे काम सुरु आहे. ही प्रक्रिया मोठी असल्याने ती पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे आम्हाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती.  त्यावर 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता 31 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com