महाराष्ट्र विधीमंडळात पाशवी बहुमताच्या जोरावर " महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ " मंजूर करण्यात आले. सरकारने नक्षलवादाचा बहाणा करून हा कायदा आणला असला, तरी या कायद्यामध्ये " नक्षलवाद " हा शब्द नाही. प्रत्यक्षात हा कायदा सरकारला विरोध करणाऱ्या, सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या आणि शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गदा आणण्यासाठी तयार केला आहे. हाच कायदा १९२२ साली ब्रिटशानी हा कायदा आणून भारतीय नागरिकांना नाहक त्रास दिला त्यांच्या विरोध म्हणून पंडित जवाहरलाला नेहरू, महात्मा गांधी यांनी पुढाकार घेऊन १९४२ साली हा कायदा रद्द करून घेतला कारण लोकांनी लोकांसाठी तयार केलेले लोकशाही हवी होती म्हणून. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक सरकारने मागे घ्यावे आणि दोन्ही सभागृहात पारित झालेल्या या विधेयकावर राज्यपालांनी सही करू नये, संविधानिक व लोकशाही अधिकारांचा सन्मान राखावा, शांततामय आंदोलन व सरकारवरील टीकेवर र्निबध त्वरित थांबवावेत या प्रमुख मागण्यासाठी आज 10 सप्टेंबर रोजी मुंबईसह ठाण्यात विविध संस्था संघटना आणि महाविकास आघाडीतील पक्ष संघटनाच्या वतीने प्रचंड निदर्शने करण्यात आली.
मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले, यावेळी काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड, माजी आमदार अशोक जाधव,भाकपा, खजिनदार संदीप शुक्ला, अनुसूचित जाती विभागचे मुंबई अध्यक्ष कचरू यादव, माजी नगरसेवक रघुनाथ थवई, प्रवक्ते अर्शद आझमी, आनंद यादव, जयवंत लोखंडे, रोशन शहा, राजेश इंगळे, कृपा शंकर सिंग, निलेश नानचे आणि माकपा यांच्यासह इंडिया आघाडीतील पक्ष व स्वयंसेवी संघटनांचे सदस्य उपस्थित होते. तर जन सुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील विविध संस्था संघटना आणि महाविकास आघाडीतील पक्ष संघटनाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णकृत पुतळ्याजवळ ठाणे स्टेशन प. येथे निदर्शने करण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना ( उबाठा ), यांच्या सह जनआंदोलनाचा राष्ट्रीय smnvy, भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल, शोषित जनआंदोलन, श्रमिक जनता संघ, एम.एस. इ. बी कर्मचारी संघटना, भारतीय महिला फेडरेशन, घर कामगार संघटना आदी विविध संस्था संघटनाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारतीय महिला फेडरेशनचे सदस्य निर्मला पवार, भारत जोडो अभियानचे राजेंद्र चव्हाण, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अजय भोसले, राष्ट्रसेवा दलाचे उद्य चौधरी, अनुबंध संस्थेचे मीनल सोहनी, सूर्यकांत कोळी, विशाल जाधव, प्रभाकर घुले, इंदवी तळपुदे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पुष्पा तापोळे, अजित डफळे, ओसामा रावल, अन्न पुरवठा समितीचे मुक्ता श्रीवास्तव, श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया, संघटक गणेश चव्हाण, सुभाष खाणेकर, नरसिभाई झाला, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लिलेश्वर बनसोड, अँड रवींद्र मोरे, भास्कर गव्हाळे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, रेखा खोपकर, सामाजिक कार्यकर्ता संग्राम डोंगरे, शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे माजी खासदार राजन विचारे जिल्हाध्यक्ष केदार दिघे, नरेश मणेरा, सचिन चव्हाण आणि इतर सदस्य संस्था यांनी स्वयंस्फूर्तीने आलेले अनेक बुद्धजीवी आंदोलक सहभागी झाले होते.




0 टिप्पण्या