Top Post Ad

दलित पँथर रिपब्लिकन सेनेत विलीन

 रिपब्लिकन पार्टीच्या आठवले गटातून ठाण्याचे नगरसेवकपद भूषवलेले रामभाऊ तायडे यांनी नंतर नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅंथरची धुरा अंगावर घेतली होती.  मात्र कालांतराने दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका ढसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर तायडे यांनी स्वतःची स्वतंत्र दलित पँथरची निर्मिती केली होती. आज हाच दलित पँंथर पक्ष आपल्या समर्थकासह तायडे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला.  यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले. ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विशास व्यक्त केला..

 नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्याना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी (शिंदे गट) युती केली आहे. आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. देशात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, शहर प्रभारी मायाताई कांबळे, राहुल उंबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com