डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) येथे सध्या विद्यार्थ्यांच्या समस्या गंभीर आहेत. परीक्षा , निकाला संदर्भातील त्रुटी, शुल्कवाढ, अपुऱ्या सुविधा आणि प्रशासकीय ढिसाळपणा तसेच. परीक्षा विभागाचा जो काही सावळा गोंधळ आहे त्यातून विद्यापीठ कधी सावरणार असा प्रश्न येथील विद्यार्थीवर्ग विचारत आहे. मुळात त्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन तसदी सुद्धा घेत नाही. विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर लागत नाही, गुणपत्रिका मिळत नाही, मिळाली तर कधी कधी ती वेगळ्याच विद्यार्थ्याची असते. असेही काही विद्यार्थ्यांच्या म्हणणे आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी तंत्रशास्त्र विद्यापीठ ४०० हून अधिक महाविद्यालय या विद्यापीठाशी संलग्नित असून महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून विद्यार्थी समस्या घेऊन येत असतात परीक्षा विभागाच्या बाहेर सकाळी चार वाजेपासून रांगेत उभे असतात, परंतु दरदिवशी १० अर्ज स्वीकारली जातात. शेकडो विद्यार्थी समस्या घेऊन येतात मग समस्येच्या पूर्ततेसाठी, आपला प्रश्न सुटेल ही भाबडी आशा मनात बाळगून विद्यार्थ्यांना स्वखर्चाने तीन दिवस मुक्कामी राहावे लागते. त्यांची कोणत्याही प्रकारची निवासाची सोय विद्यापीठा मार्फत केली जात नाही.

0 टिप्पण्या