Top Post Ad

मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय

  फडणवीस सरकार मराठ्यांना फसवत आहे , हे सत्य मनोज जरांगे पाटील यांना मी सांगत होतो. त्यांनीच जी आर तपासण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती. परंतु ऐकले गेले नाही, असा आरोप मराठा नेते एड. योगेश केदार यांनी केला तसेच  आम्ही चर्चेला येऊ, पण मराठवाड्यातील मराठ्यांना “कुणबी” प्रमाणपत्र देण्याचा अधिकारक्षेत्र आहे का? मराठवाड्यातील साडे आठ हजार गावापैकी दीड हजार गावांमध्येच कुणबी नोंदी आहेत, उरलेल्या सात हजार गावातील मराठ्यांना कुणबी नोंदीच नाहीत, त्यांना तुम्ही ओबीसी देऊ शकणार आहात का? असे प्रश्नही केदार यांनी विखे-पाटील यांना विचारले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आता तरी चिंतन करावे, समाजाच्या एकीसाठी अंतरवली सोडून त्रयस्थ ठिकाणी चर्चेसाठी यावे असे आवाहन योगेश केदार यांनी केले असतानाच आता  मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे, पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय," अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या जीआर वरून राज्यातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे यांना धारेवर धरलंय, मनोज जरांगे हे आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बुवाबाजी चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

 डॉ. संजय लाखे पाटील म्हणाले, "मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात. ते समस्त मराठा समाजाचे नव्हे तर कुणबी समाजाचे नेतृत्व करत आहेत. जरांगेंची एकही मागणी वैद्य, कायदेशीर, घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही. त्यांना कायदा आणि शासन आदेश यातला फरकच कळत नाही. समाजाने जरांगेवर केवळ फुलांवर 100 कोटी उधळले, पण चुकीच्या पद्धतीने आंदोलन चालवून मराठा समाजाचे नुकसानच होत आहे. मनोज जरांगे आंदोलनातून स्वतःची बुवाबाजी चालवतात. त्यांना स्वतः पुढून कॅमेरा जायला नको असं वाटतं.  मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना टार्गेट करण्याचं काम ते सूत्रबद्ध पद्धतीने करतात. मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनाने दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता. केवळ सरकारचा जयजयकार करण्यासाठी गुलाल उधळला गेला. आधीच सरकारसोबत ड्राफ्ट तयार करतात आणि मग अभ्यासकांना बोलावून चर्चा करण्याचे नाटक करून समाजाची फसवणूक करतात",  मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीने मनोज जरांगे टार्गेट करत आहेत. आरएसएस अजेंड्याचा उल्लेख करत ते म्हणाले, "जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं नाही तर त्यांना सपोर्ट मिळणार नाही. अन्यथा देवेंद्र फडणवीस तीन महिने देखील मुख्यमंत्री राहू शकत नाहीत. RSS च्या अजेंड्यानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत. मराठा समाजाची राधाकृष्ण विखे पाटलांनी बेईमानी केली. ही मागणी घटनात्मक, कायदेशीर किंवा वैद्य नसल्याचेही स्पष्ट आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com