दररोज जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करणारे ठाणेकर मेट्रोकडे डोळे लावून आहेत. ठाणेकरांसाठी मेट्रो-४ हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे गेल्या चार वर्षात शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या तारखा घोषित करून देखील ठाणे मेट्रोचे काम अपूर्णच आहे. चारवेळा देण्यात आलेल्या डेडलाईन उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास आलेला नाही. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून २०१७ पासून मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली.त्याची आज 2025 साली ट्रायल झाली अनेक अडचणींवर मात करीत अखेर ठाणे शहराची पहिली मेट्रो सज्ज झाली आहे. ग्रीन लाईन अंतर्गत येणाऱ्या ठाणे मेट्रोची पहिली चाचणी आज २२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यामुळे ठाणेकर नक्कीच काही प्रमाणात का होईना सुखावले. वाहतूक कोंडीचा बोजवारा नेहमीच अनुभवणाऱ्या ठाणेकरांना आता ही मेट्रो केव्हा धावते याचीच प्रतिक्षा आहे.
या ट्रायल रननंतर इतर सर्व तांत्रिक गोष्टी तपासून डिसेंबर 2025 पर्यंत ठाण्यातील मेट्रो सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा भाग तयार होईल. कासारवडवली ते गायमुख यांना जोडणारा ग्रीन लाइन 4 A विस्तार 90 टक्के पूर्ण झाला असून या वर्षाच्या अखेरीस तो सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पहिली मेट्रो या वर्षाच्या शेवटी धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. BEML चे 6 डब्यांचे ट्रेन-सेट्स जे मेट्रो मार्ग 2 अ व 7 वर चालत आहेत त्याच पध्दती, आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा शोध उपकरण, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा, ऑन-बोर्ड सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली, ऊर्जा बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली (सुमारे 30 टक्के बचत). अशी मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत.

ठाणे येथे १६,००० कोटी रुपयांच्या मेट्रो-४ आणि मेट्रो-४अ प्रकल्पांसाठी गायमुख ते डोंगरीपाडा या ४.६३८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही चाचणी रन झाली. एमएमआरडीएने (MMRDA) बांधलेल्या या प्रकल्पामुळे ठाणे आणि मुंबईमधील वाहतूक सुरळीत होईल. पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन आणि गायमुख स्टेशन दरम्यान सेवा सुरू होईल, ज्यामध्ये १० स्थानके असतील. एमएमआरडीएच्या पहिल्या टप्प्यात, मेट्रो-४ सेवा १० किलोमीटरच्या मार्गावर सुरू करण्याचे नियोजन होते. तथापि, वीज पुरवठ्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे, या ४.६३८ किलोमीटरच्या मार्गावर चाचणी सुरू करण्यात आली. आता, आवश्यक व्यवस्था केल्यानंतर उर्वरित मार्गावर चाचणी सुरू केली जाईल. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) द्वारे विकसित केला जात आहे.वडाळा, कासारवडवली आणि गायमुख दरम्यान मेट्रो-४ आणि मेट्रो-४ए कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. तांत्रिक तपासणी आणि चाचणी धावांचा पहिला टप्पा आज सुरू करण्यात आला. मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा असून, यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचा उद्देश ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांतील दळणवळण अधिक सुलभ, वेगवान करणे हा आहे.

कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिकुजी-नी-वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवानिवाडा, गायमुख अशी ट्रायल रनमधील 10 स्थानके आहेत. 35 किलोमीटरची एकूण लांबी असलेल्या मेट्रोत एकूण 32 स्थानके आहेत. जवळपास 16 हजार कोटी रुपये या करिता खर्च करण्यात येत आहेत. मोघरपाडा येथे डेपो करता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली असल्याने मेट्रो चार, मेट्रो चार अ, मेट्रो 10 आणि मेट्रो 11 अशा सगळ्यांचा डेपो म्हणून त्या ठिकाणी मोठे काम होणार आहे. या मार्गीकेवरील मेट्रो आठ डब्यांची असणार आहे. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे. त्यामुळे हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल. 58 किलोमीटरचा हा मार्ग होईल. यात दररोज 21 लाख लोक प्रवास करू शकतील. या मेट्रोमार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्के कमी होणार आहे. एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल, मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे होणारा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळाल्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले.
मागील ८ वर्षे महामार्गावर मोठ्या प्रमाणात बॅरिगेटींग करून मेट्रोचे खांब उभारण्याची कामे सुरू असून ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरू असून आत्तापर्यंत वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो प्रकल्पाचे ६७ टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास आली असल्याची माहिती एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र ज्या गतीने हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा करण्यात आली होती, त्या वेगाने हे काम सुरू नसल्याचे दिसत आहे. मेट्रो-४ हा प्रकल्प नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाप्रमाणेच रखडला आहे. आता हा प्रकल्प सुरू होण्यासाठी डिसेंबर २०२५ ही नवीन तारीख एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आली असल्याने मेट्रो-४ मधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना जवळपास २०२६ उजाडण्याची वाट पहावी लागणार. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी शासनाकडून या भागातील गृहखरेदी विक्री व्यवहारावर मेट्रो सेजही लागू करण्यात आला आहे. मेट्रो सुरू होण्यापूर्वीच राज्य शासनाकडून सेजच्या माध्यमातून नागरिकांकडून शासकीय शुल्क आकारण्यात येत असले तरी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न आता ठाणेकर विचारत आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण प्रकल्प २०१९ मध्ये सुरू झाला असून ही मेट्रो २०२३-२४ पर्यंत होण्याचे ठरले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२४, डिसेंबर २०२५ आणि आता जून २०२६ पर्यंत लांबले आहे. तर २०२३ मध्ये सुरू झालेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे काम ऑक्टोबर २०२६ वरून आता डिसेंबर २०२७ पर्यंत लांबल्याचे समोर आले आहे.
वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली-गायमुख या ‘मेट्रो मार्गिका-4 आणि 4-अ' प्रकल्पाची एकूण लांबी 35.20 किमी आहे. या संपूर्ण उन्नत मार्गावर एकूण 32 स्थानके असतील. प्रकल्पाचा एकूण खर्च 15,498 कोटी आहे. तर अंदाजे 2031 पर्यंत दररोज 13.43 लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील असा अंदाज आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन प्रमुख टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.
टप्पा-1 : या टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंतची 10.5 किमीची मार्गिका सुरू होईल. यामध्ये एकूण 10 स्थानके असतील. यापैकी 4 स्थानके डिसेंबर 2025 पर्यंत, तर उर्वरित 6 स्थानके एप्रिल 2026 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
टप्पा-2 : कॅडबरी जंक्शन ते गांधी नगरपर्यंतचा 11 किमीचा टप्पा ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात 11 स्थानके असतील.
टप्पा-3 : गांधी नगर ते वडाळापर्यंतची 12 किमीची अंतिम टप्पा ऑक्टोबर 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या चारही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यावर सुमारे 58 किमीचा भारतातील सर्वात मोठा उन्नत मार्ग उपलब्ध होईल.
0 टिप्पण्या