Top Post Ad

महापरिनिर्वाण दिनी पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांची पूर्वतयारी बैठक महापालिकेत संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज ३१ ऑक्टोबर रोजी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सह महानगर आयुक्त  आस्तिककुमार पांडेय, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी, तसेच भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य. आंबेडकर,  डॉ. भदंत राहूलबोधी  महाथेरो,  रिपाईचे गौतम सोनवणे, रिपब्लिकन सेनेचे  रमेश जाधव,  प्रतीक कांबळे, नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 


दादर (पश्चिम) परिसरातील चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे  महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या  नागरी सेवा - सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी संबंधित अधिकारी आणि खात्यांना यावेळी दिले आहेत. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व नागरी सोयी-सुविधा योग्यप्रकारे मिळतील, यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी – कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी विशेष खबरदारी घ्यावी व सजगतेने कार्यतत्पर राहून नेमून दिलेली कार्ये वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही गगराणी यांनी दिल्या. तसेच चैत्यभूमीसह संबंधित परिसरांमध्ये सर्व  सोयी-सुविधा पुरविण्यास महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे  महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांनी आवर्जून नमूद केले.  महानगरपालिकेद्वारे दादर येथील चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान  (शिवाजी पार्क) परिसरात अधिक दर्जेदार सेवा - सुविधा पुरविण्यात येतील. आवश्यकता असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी बैठकी दरम्यान संबंधितांना दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्य समन्वय साधून कार्यवाही करावी, अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे आदेशही आयुक्त महोदयांनी यावेळी दिले. 

उप आयुक्त (परिमंडळ-२)  प्रशांत सपकाळे यांनी प्रास्ताविक करताना महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. प्रामुख्याने चैत्यभूमी स्मारक, तोरणा प्रवेशद्वार, अशोक स्तंभ, भीमज्योत व परिसराची रंगरंगोटी, उद्यान परिसराचे सुशोभीकरण, अभिवादनाकरिता पुष्पचक्र, टेहळणी मनोरा, नियंत्रण कक्ष, भागोजी कीर स्मशानभूमी येथे अनुयायांच्या रांगेकरिता दुतर्फा पडदे, स्थळ निर्देशक फुगा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व आसन व्यवस्था, पोलीस खात्यामार्फत शासकीय मानवंदना, पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व वितरण, अनुयायांकरिता तात्पुरत्या स्वरूपात जल प्रतिबंधक (वॉटरप्रुफ) निवासी मंडप, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात माहिती व दिशादर्शक फलक लावणे, मैदानामध्ये धूळ-प्रतिबंधक व्यवस्था, स्वच्छतेची व्यवस्था, वैद्यकीय सेवा-सुविधा, भोजन मंडपाची व्यवस्था, भिक्खूसंघाकरिता ध्यान साधना शिबिर कक्ष, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दल व्यवस्था, भ्रमणध्वनी (मोबाईल) चार्जिंग सुविधा इत्यादी बाबींची माहिती  सपकाळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com