Top Post Ad

बिनविरोधचे स्वप्न पाहणाऱ्या नील सौमय्यांना धक्का.... भाजपचे मुंबईत 22 गुजराती, मारवाडी उमेदवार

मुलुंडच्या वार्ड क्रमांक 107 मधून माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या  यांचा मुलगा नील सोमय्या महापालिकेची निवडणुक लढवत आहेत. ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. मात्र, राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरला होता. तो बाद ठरला कि ठरवला गेला या विषयी सध्या या वार्डात जोरात चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून  उमेदवार देण्यात आलेला नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादीचा अर्ज बाद ठरल्याने वॉर्ड क्रमांक 107 ची जागा नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाली होती. बिनविरोधचे बॅनर झळकवण्याची तयारी देखील करण्यात आली होती. परंतु ऐन वेळेला शिवसेना ठाकरे गटाकडून नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार देण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दिनेश जाधव यांनी वॉर्ड 107 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना ठाकरे गटाकडून दिनेश जाधव  यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत  यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. 

बिनविरोध करिता नील सोमय्या यांनी अनेकांना दमदाटी केली, असा गंभीर आरोप दिनेश जाधव यांनी केलाय. मात्र, मला दमदाटी करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशा शब्दात दिनेश जाधव यांनी नील सोमय्या यांना आव्हान दिले आहे. तसेच नील सोमय्या काहीतरी गडबड करणार, याची मला माहिती होती. त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला, असे देखील त्यांनी म्हटले आहे. सोमय्या यांनी आतापर्यंत अनेकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी अशा धमक्यांना भीक घालत नाही. या प्रभागातील जनता मराठी अस्मितेसाठी आणि हक्काच्या प्रतिनिधीसाठी मला साथ देईल," असा विश्वास देखील दिनेश जाधव यांनी व्यक्त केलाय. हा वॉर्ड मराठी भाषिक आहे. मराठी मतदार इथे जास्त आहेत. आमची पूर्वीपासून इच्छा होती की, हा वॉर्ड मनसे, शिवसेना, आणि राष्ट्रवादीच्या युतीत आम्हाला मिळायला हवा. परंतु, वाटाघाटीत ती जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली. तरीसुद्धा एक शंका होती की, सध्या निवडणूक आयोग जे करत आहेत आणि तिथे ज्या प्रमाणात दादागिरी सुरू आहे, त्या भीतीपोटी कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी येईल. त्यामुळे मी 30 तारखेलाच अपक्ष फॉर्म भरून ठेवला होता. अशी माहिती दिनेश जाधव यांनी माध्यमांना दिली.

अजून काही अपक्ष उमेदवारांसोबत दमदाटी करण्यात आली होती. काही गुजराती उमेदवार होते. त्यांच्यासोबत देखील दमदाटी करण्यात आली होती. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांना वाटले की, नील सोमय्या बिनविरोध होईल आणि जिंकून येईल. पण, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेल्या 30-35 वर्षांपासून मी या प्रभागात काम करत आहे. शाखाप्रमुख म्हणून मी दहा वर्ष काम केले आहे. आता उपविभाग प्रमुख म्हणून मी आठ वर्षापासून काम करत आहे. माझ्यासोबत शिवसैनिकांची ताकद आहे. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवले की नील सोमय्यांसोबत लढायचे, असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका, अशी ओळख असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने वर्चस्व टिकवण्यासाठी पारंपरिक गुजराती आणि मारवाडी मतदारांवर लक्ष केंद्रित केलं आहे. उपबल्ध आकडेवारीनुसार भाजपने एकदोन नव्हे तर तब्बल 22 गुजराती, मारवाडी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. सहाजिकच ही भाजपची मोठी राजकीय खेळी असून आता त्याचा परिणाम कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदासुद्धा देशाच्या या आर्थिक राजधानीच्या मनपा निवडणुकीसाठी भाजपनंच सर्वाधिक गुजराती, मारवाडी उमेदवार दिल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबईचे आद्य रहिवासी म्हणून कोळी, आगरी, पाठारे प्रभू यांना प्राधान्य दिलं जातं, त्याचप्रमाणं गुजराती-मारवाडी समाजही शहरात महत्त्वाचा आहे. भाजपसाठी मुंबई हा पारंपरिक मतदार असून, याच मतदारांसाठी भाजपने मुंबईत 22 गुजराती, मारवाडी उमेदवार दिले आहेत.

जितेंद्र पटेल- प्रभाग 10 /  जिग्ना शाह- प्रभाग 15 /  हिमांशू पारेख- प्रभाग 22 / नितीन चौहान- प्रभाग 29 / धवल व्होरा- प्रभाग 30 / सिद्धार्थ शर्मा- प्रभाग 36 /  हर्ष पटेल- प्रभाग 55 / संदीप पटेल- प्रभाग 58 / आरती पंड्या- प्रभाग 66 / सुनीता मेहता- प्रभाग 71 / केसरबेन पटेल – प्रभाग 81 / हेतल गाला- प्रभाग 97 / हेतल गाला मारवेकर- प्रभाग 103 / नील सोमैय्या- प्रभाग 107 / धर्मेश गिरी- प्रभाग 130 / कशिश फुलवारिया- प्रभाग 151 / गोरंग झवेरी- प्रभाग 217 / आकाश पुरोहित- प्रभाग 212 / रीता मकवाना- प्रभाग 222 / रोहन राठोड- प्रभाग 68 / कप्लेशा कोठारी, मीनल पटेल अशी भाजपच्या गुजराती आणि मारवाडी उमेदवारांची नावं आहेत. भाजपनं सर्वाधिक गुजराती आणि मारवाडी मतदार दिलेले असतानाच काँग्रेसने सहा गुजराती-मारवाडी उमेदवारांना तिकीट दिलं आहे, तर शिवसेना (ठाकरे) पक्षाने एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक गुजराती उमेदवार दिला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने वडाळा येथून एका गुजराती महिलेला उमेदवारी दिल्याचं म्हटलं जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com