Top Post Ad

शालेय साहित्य वाटप करत शिवजयंती महोत्सव साजरा

. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभर साजरी करण्यात आली. महाराजांचा आदर्श घेत समाजहिताचे नवनवे उपक्रम राबवण्यात संघटनेचा कल असतो. त्यामागे छत्रपतींचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रमाणिक प्रयत्न. यंदा ही शिव जयंती देशभरात थाटामाटात साजरी करण्यात आली. भायखळ्यातील भीमनगर येथे तरुणांच्या पुढाकाराने साजरी करण्यात आलेल्या शिव जयंतीचे विशेष कौतुक होताना दिसत आहे.


यंदा शिव जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महिलांसकट बच्चे पार्टी आघाडीवर होते. वेशभूषा स्पर्धेमुळे यंदा बाल शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, आदी महापुरुष बालरूपी भायखळ्यात अवतरले. बाल कलाकारांनी साकारलेले ऐतिहासिक पात्र लोकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तसेच या कार्यक्रमाला देशभक्तीचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा जय घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.

▫️' तरुणांच्या वतीने आणि नवतरुण उत्सव मंडळाच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शैक्षणीक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. या उपक्रमाचे नागरिकांनी तोंडभर कौतुक केले.'

शेवटी विजेत्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोज कदम, जितेंद्र कदम, सुजल शिर्के, रोहन कांबळे, तुषार सरोदे, सुजल पवार, प्रतिक पवार, अक्षय पवार, आर्दश जाधव, आशिष जाधव, योगेश गायकवाड, चंदन ठाकुर, जय सुर्वे, सुमेध सुर्वे, आदिराज जाधव, कार्तिक शिर्के, मोक्ष आगने, नितीन सोनवणे, मुकेश शिर्के, राकेश शिर्के, श्रीकांत वाढाणे, स्वप्निल रोकडे यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com