Top Post Ad

शैक्षणिक भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ठोस पावले उचलले नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार

राज्यात शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हावार कार्यकर्ते अनेक वर्षापासून आवाज उठवत आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार संपावा म्हणून SIT ची नियुक्ती केली, सर्व कार्यकर्त्यांनी SIT कडे पुराव्यासह तक्रारी केल्या पण आठ महिने होत आले पण काहीही कार्यवाही होतांना दिसत नाही हा महाघोटाळा दाबला जाऊ नये म्हणून आम्ही राज्यभरातील कार्यकर्ते एकत्र येऊन SIT प्रमुख व इतरांकडे फेऱ्या मारत आहोत पण दाद देत नसल्याचा आरोप शैक्षणिक सुधार समितीच्या वतीने आज मुंबईत करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यासाठी आज समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनार्दन जंगले, शिवनाथ दराडे, प्रकाश घोळवे, डॉ प्रा सुभाष राणे, विठ्ठल शिंगाडे, श्रद्धा परब, सचिन हाडगे, चंद्रकांत गायकर, अॅड अपूर्वा दाभोळकर सुनील वडतकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर भ्रष्टाचार प्रकरणी आवाज उठवावा म्हणून शैक्षणिक सुधार समिती चे कार्यकर्ते आज मुंबईत एकत्र आले. भ्रष्टाचारी अधिकारी, संस्थाचालक यांचेवर कठोर कारवाई व्हावी, SIT ने जिल्हावार चौकशी अहवाल सादर करावा, महत्वाचे असे की सर्व शाळा कॉलेजेस हे राजकीय संस्थाचालक चालवित आहेत, संस्थाचालकांचे व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांचे संगनमत असून काही चौकशी अधिकारी सुद्धा भ्रष्ट आहेत, त्यांचेकडे वारंवार जाऊनही दाद देतं नाहीत, अधिकाऱ्यांचे संपत्तीची आर्थिक गुन्हे खात्यातर्फे चौकशी करण्यात यावी, त्यामुळे व राजकीय दबावामुळे प्रकरणे दडपले जाऊ शकतात ही भीती व्यक्त करण्यात आली, शिक्षणावरील खर्च वाढवावा, प्रामाणिक व राज्याविषयी प्रेम असणारे अधिकारी नेमावे, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे, अधिकाऱ्यांचे संपत्तीची आर्थिक गुन्हे खात्यातर्फे चौकशी करण्यात यावी, भ्रष्टाचार समूळ निपटून काढून शिक्षण क्षेत्र पवित्र करावे. अशा मागण्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या. परंतु त्याकडे यंत्रणेकडून दुर्लक्ष झाले. सदर सर्व प्रकरणी पारदर्शकपणे चौकशी अहवाल सादर झाला, मात्र भ्रष्टाचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी ठोस पावले उचलले नाही तर शैक्षणिक सुधार समिती तर्फे उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com