दिशा महाराष्ट्राची या YouTube चॅनेल च्या माध्यमातून गेली चार वर्षे अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून त्याद्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करून गौरविण्यात आले आहे, तसेच मराठी भाषा, साहित्य, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन सद्य घडामोडींवर लिखाण करून प्रसिद्ध करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत त्याच पार्श्वूमीवर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "उत्सव महिला दिनाचा सन्मान स्त्री जन्माचा" या माध्यमातून आपल्या कर्तुत्वाने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या ५० महिलांची निवड करून त्यांना "राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान गौरव पुरस्कार २०२६", "राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान गौरव पुरस्कार २०२६" देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार समाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी, साहित्य, क्रीडा, अध्यात्म, पत्रकारिता, युवा, डॉक्टर, महिला बचत गट या नामांकन विभागांतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर कार्यक्रम रविवार दि. १५ मार्च २०२६ सकाळी १०:३० ते ४:३० वेळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, प्लॉट नं. ४१, तेजस्विनी वर्किंग वुमन्स हॉस्टेल समोर, सेक्टर नं. १०, जुईनगर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी इच्छुक महिलांनी दिशा महाराष्ट्राची वाहिनीचे प्रमुख संपादक तुषार गौतम नेवरेकर यांना ७२१८४६७९६३ या भ्रमणध्वणी वर संपर्क साधून आपला प्रस्ताव पाठवावा असे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या