Top Post Ad

सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी जल्लोषात साजरा केला जागतिक महिला दिन

लावणी, फ्युजन, पारंपारिक सण-उत्सव अशा विषयांवर आधारित नृत्यरचना आणि एकापेक्षा एक बहारदार गाणी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सादर करुन जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला. महिला ही घर सांभाळतेच पण पद, प्रतिष्ठा या सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटवून समाजात स्वत:चे स्थान भक्कम करते, अशा अलौकिक कार्य करणाऱ्या स्त्रियांचा मला अभ‍िमान आहे. ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिकेने मंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले व महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित होते.


राम गणेश गडकरी रंगायतन येथे  आज  (9 मार्च) ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, अनघा कदम, डॉ. मिताली संचेती, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम, सहायक आयुक्त ललिता जाधव, सोनल काळे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्या हस्ते करण्यात आले.               प्रास्तविकपर भाषणात उपायुक्त् अनघा कदम यांनी समाज विकास विभागातर्फे गरीब गरजू महिलांसाठी, मुलींसाठी तसेच विधवा महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी महिला व बालकल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले

            जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादर केली. ‘गजानना श्री गणराया, ऐका दाजिबा.., फुलले रे क्षण माझे.., खेळताना रंग बाई होळीचा अशी एकापेक्षा एक बहारदार गाणी यावेळी सादर करण्यात आली. तर पारंपारिक सण-उत्सव जसे ‘मंगळागौर, कोळी नृत्य, मराठी फ्युजन, बॉलीवूड फ्युजन, नृत्याने कार्यक्रमात आणखी रंगत आणली. महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सोलो नृत्यालाही रसिकांनी भरभरुन दाद देत प्रेक्षागृहात ठेका धरला.               या कार्यक्रमात ठाणे महापालिका मुख्यालय, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यींनी, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी, आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, प्रभाग समितीमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच महापालिकेतून सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमास हजेरी लावून गाण्यावर ठेका धरत कार्यक्रमाला अधिक बहार आणली.

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेल्‌या विद्यार्थ्यींनींचा सन्मान- ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणा-या अंकिता अनिल पाटील (RANK 140), हिचा आणि दिपाली महातो (RANK 36)  या विद्यार्थीनीच्या पालकांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा घेण्यात आलेल्या रांगोळी, निबंध, मेहंदी या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com