Top Post Ad

ठाण्यातील गॅस सिलेंडर पुरवठ्याचा महापौर व आयुक्तांनी घेतला आढावा

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थ‍ितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत घरगुती तसेच व्यावसायिक गॅस  सिलेंडरच्या पुरवठ्याची सद्यस्थिती, उपलब्ध साठा तसेच वितरण व्यवस्था याबाबतचा सव‍िस्तर आढावा घेण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (23 मार्च) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. नागरिकांना वेळेत गॅस मिळावा, शहरात कुठेही गॅसचा काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्याचे तसेच ज्या सोसायट्यांमध्ये प्रलंबित महानगर गॅसची कनेक्शन त्वरित सुरू करण्याबाबतची  कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिले.


        या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ. शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभ‍िजीत पवार, सरफराज खान, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, पोलीस विशेष शाखेच्या मीना मकवाना, उपआयुक्त मधुकर बोडके, शिधावाटप कार्यालयाचे प्रशांत काळे, सुरेखा चव्हाण सुभाष डुंबरे, रोहित माळकर, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे नोडल अधिकारी चित्रा नायर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मयांक तलरेजा, इंड‍ियन ऑईल कॉर्पोरेशनचे सारंश शाहू, तसेच महानगरगॅसचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर वेळेत मिळत आहे. तसेच वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे एचपी गॅसचे जिल्हा नोडल अधिकारी चित्रा नायर यांनी नमूद केले. विशेषतः लहान व्यावसायिकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत शासनस्तरावर चर्चा सुरू असून शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

           प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील मागण्या संकलित करून त्या संबंधित कंपन्यांकडे पाठवाव्यात. त्यानुसार महानगर गॅस व इतर गॅस कंपन्यांनी प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

           अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नाही. अशा ठिकाणी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी पाईप गॅस कनेक्शन मंजूर असूनही प्रत्यक्ष पुरवठा सुरू झालेला नसल्याचे निदर्शनास आले. काही भागांमध्ये ४ ते ५ वर्षांपासून गॅस पुरवठा प्रलंबित असल्याची बाबही समोर आली. या प्रकरणांमध्ये तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

           गॅस पाइपलाइन सप्लायवर अधिक लक्ष केंद्रित करणे, प्रत्येक प्रभागात रेशनिंग ऑफिस व गॅस एजन्सींमध्ये समन्वय वाढवणे, नागरिकांच्या प्रलंबित अर्जांची यादी तयार करून ठराविक वेळेत निपटारा करणे, गॅस कनेक्शनसंदर्भातील कामासाठी निश्चित टाइमलाइन ठरवणे तसेच स्थानिक नगरसेवकांकडून प्राप्त तक्रारी संकलित करून त्या गॅस कंपन्यांकडे पाठवाव्यात आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करावी. एकूणच, गॅस कनेक्शनचा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून देशव्यापी आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांनुसार स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

 गॅस सिलेंडर पुरवठा संदर्भात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ. शानू पठाण, सर्वपक्षीय गटनेते पवन कदम, मुकेश मोकाशी, अभ‍िजीत पवार, सरफराज खान यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108658970 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com